मुंबई (प्रतिनीधी ) गेल्या दोन आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 9.20 रुपयांनी वाढ झाली आहे. वाढलेले दर आज सकाळी सहा वाजल्यापासून लागू झाले आहेत.
तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलसाठी प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ जाहीर केली आहे. 15 दिवसांतील ही 13वी वाढ आहे. या वाढीमुळे आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 9.20 रुपयांची वाढ झाली आहे.या वाढीमुळे राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 104.61 रुपये, तर डिझेलची किंमत 95.87 रुपये प्रति लीटर झाली आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर अनुक्रमे 119.67 रुपये आणि 103.92 रुपये आहेत.
दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 104.61 रुपये प्रति लिटर आणि 95.87 रुपये प्रति लिटर वाढले आहेत. तर मुंबईतही इंधनाचे दर वाढल्याने पुन्हा एकदा महागाईचा भडका उडालाय.
मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 119.67 रुपये (84 पैशांनी वाढले) आणि डिझेलचे दर 103.92 रुपये (85 पैशांनी वाढले) इतके झाले आहेत.
.jpeg)
No comments:
Post a Comment