परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- आंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर येथे चार दिवसांपूर्वी झालेल्या वादानंतर तनाव कायम आसतानाच आणखी एका तरुणावर चौघांनी कत्तीने वार करुन प्राणघातक हल्ला केला ,तसेच त्याच्या जवळील सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम काढून घेतल्याची घटना रविवारी दि,२० मार्च रोजी घडली
श्रीकांत उर्फ बबलु जाधव (रा. घाटनांदुर. ता. आंबाजोगाई )या तरुणांच्या फिर्यादी नुसार रविवारी दुपारी ३,३० वाजताच्या सुमारास तो शेतातील काम आटोपून घराकडे परत येत आसताना, त्याला गोविंद दत्तु मिसाळ ,सचिन अरविंद गोदाम, गणेश वंसत चांगीरे आणि हरिनारायण रघुनाथ दरमड हे चौघे त्याच्याजवळ आले ,आणि दारु पिण्यासाठी पैसे मागितले, श्रीकांत त्याना पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी श्रीकांतच्य बोटातील सात ग्राम सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम 7 हजार रुपये काढून घेतले ,श्रीकांतने त्यांना अंगठी आणि पैसे वापस मागितले आसता त्यांनी कशाची अंगठी आता तुला जीवे मारतो आसे म्हणत कत्तीने त्याच्यावर वार केला , आणि व लाथाबुक्यानी नी मारहाण केली, या बाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमक्या देवून ते चौघेही तिथुन निघुन गेले ,या हल्ल्यात श्रीकांत गंभीर जखमी झाला असून त्या वेळी आरडाओरडा ऐकुन धावून आलेल्या ग्रामस्थांनी जखमी श्रीकांतला आंबाजोगाईच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले व सदर फिर्यादीवरून चारही आरोपींवर कलम 307,323,326,327,506,34.अनवये आंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल केला असुन दरम्यान सतत घडत आसलेल्या गंभीर घटनेमुळे घाटनांदुर मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments:
Post a Comment