Wednesday, March 23, 2022

सौ.वच्छलाबाई कोकाटे यांचे कार्य कौतुकास्पद- सौ.स्वातीताई ताटे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) सौ.वच्छलाबाई वैजनाथराव कोकाटे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिव्हेश्वर महिला विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. स्वातीताई ताटे यांनी केले आहे.
नुकताच अहमदनगर येथे वच्छलाबाई कोकाटे यांना राजस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन करण्यात आला. परळी तालुक्यातील संगम या गावचा सर्वांगीन विकास साधून आदर्श गाव निमार्ण केले. आपला मुलगा ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे याच्या सहकार्याने सौ. कोकाटे यांनी गावातील रस्त्याची कामे, मंदिर, बौध्द विहार, हायमास्ट दिवे, सौरक्षण भिंत, शाळा रंग रंगोटी, पाणी, वृक्षारोपन, स्मशानभुमी बांधकाम, इत्यादी कामे त्यांनी आपल्या कार्यकालात उत्कृष्टरित्या केली. हे कार्य त्यांचे वाखानण्याजोगे आहे असे उद्गार सौ. ताटे यांनी काढले.
मौजे संगम येथे त्यांचा राहत्या घरी जावून शाल, श्रीफळ, साडी देवून यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी सौ. स्वातीताई ताटे, श्री. विलासराव ताटे, ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे, सौ. कोकाटे, श्री. वैजनाथराव कोकाटे इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment