Saturday, March 5, 2022

भा.ज.पा.ची बुलंद तोफ लहान थोरांचे लाडके नगरसेवक प्रा.पवन मुंडे यांच्यावर वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव.

* पंकजाताई मुंडे, खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी पालिकेतील भाजपचे नगरसेवक प्रा. पवन मुंडे यांचा काल शुक्रवारी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्ताने पवन मुंडे यांना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, बीडच्या खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवर आणि नागरीकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्यावर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव झाला.
       राजकारणासोबतच सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रा. पवन मुंडे यांचे काम आहे. नगरसेवक म्हणून त्यांनी अतिशय भरीव काम करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शुक्रवारी प्रा. पवन मुंडे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी दुरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनीही शुभेच्छा दिल्या. विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते, डॉक्टर, वकील, व्यापारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, प्रभागातील नागरीकांनी शुभेच्छा दिल्या.
        दुरध्वनी, व्हाट्‌सअप, फेसबुक आदी सामाजिक माध्यमांवरून अनेकांनी प्रा. पवन मुंडे यांना शुभेच्छा दिल्या. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. "माझ्या नेत्या आणि माझ्यावर प्रेम करणार्‍या नागरीकांनी मला प्रत्यक्ष भेटून, समाज माध्यमातुन मला शुभेच्छा दिल्या. या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. नागरिकांच्या प्रेमाने मला आणखी उर्जा, प्रेरणा मिळाली असुन मि कायम त्यांच्या ऋणात राहील आणि जोमाने सामाजिक काम करीत राहिल असे उदगार प्रा. पवन मुंडे यांनी काढले.

No comments:

Post a Comment