बीड - बीड जिल्ह्य़ात ढीगभर ऊसतोड मजुरांचे नेते हातात कोयते घेऊन राजकीय फायद्यासाठी ऊसतोड मजुरांचे मेळावे घेत आपणच त्यांचे तारणहार असल्याचा दावा करणारे ऊसतोड मजुरांचे नेते संशयास्पद मृत्यु झालेल्या २३ वर्षीय कोविड वीर सेवक मयत आकाश सोमीनाथ वाल्हेकर याच्या बाबतीत मात्र मुग गिळुन गप्पच असुन संबधित प्रकरणात न्याय मिळावा यासाठी आकाशचे आईवडील व भावाने पोलीस अधिक्षक बीड, जिल्हाधिकारी बीड यांना लेखी तक्रार करत आंदोलनाचा ईशारा दिला आहे.
सविस्तर माहीतीस्तव
बीड जिल्ह्य़ातील शिरूर (कासार)तालुक्यातील मौजे जाटनांदुर येथील सोमीनाथ त्रिंबक वाल्हेकर दांम्पत्य लहान मुलगा सुरज यांच्यासह मौजे डोणज ता. मंगळवेढा जि.सोलापूर येथील युटोपीन साखर कारखान्यावर ऊसतोडी करत असताना व ऊसतोड मजुर कमतरता भासल्याने बीड जिल्हारूग्णालयात कोविड कालावधीत ब्रदर म्हणून काम केलेला २३ वर्षीय आकाश ऊसतोडी साठी आला होता, दि.२७ जानेवारी २०२२ रोजी आजारी असल्याने डोणज येथील डाॅ.गुगडे यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले होते परंतु ३-४ तासानंतर घरून पैसे घेऊन येईपर्यत आकाश दवाखान्यात नसुन त्याचे प्रेत दवाखान्यापासुन पाऊण किलोमीटर अंतरावरील कॅनालजवळ अर्धनग्न अवस्थेत आढळुन आले, त्याच्या गुडघे तसेच अंगावर मारहिणीच्या खुणा दिसुन येत होत्या, गळ्याभोवती रूमाल आवळलेला, नाकातोंडात माती, मुठी आवळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळुन आला, डाॅ.गुगडेंना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे करत यांनाच धमकावले,तपास आधिकारी पीआय माने यांनी यांचे म्हणणे ऐकुन न घेताच धडधडीत दिवसा खुन झाल्याचे दिसत असतानाही आत्महत्या वगैरे असेल म्हणत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, संबधित प्रकरणात न्याय मिळावा यासाठी मयत आकाशचे आईवडील व लहानभाऊ यांनी पोलीस अधिक्षक बीड व जिल्हाधिकारी बीड यांना लेखी तक्रार केली आहे.
ऊसतोड मजुर नेत्यांनी कोविड वीर सेवक मयत आकाशच्या कुटुंबियांना न्याय मिळवुन द्यावा:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
परजिल्ह्यात कोविड कालावधीत बीड जिल्हारूग्णालयात ४-५ महिने ब्रदरची सेवा देणा-या माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंढे यांच्या हस्ते कोविड वीर सेवक प्रमाणपत्र मिळवलेल्या आकाशच्या संशयास्पद मृत्यु प्रकरणात कुटुंबियांनी आ.सुरेश आण्णा धस तसेच खा. प्रितमताई मुंढे यांच्याशी संपर्क साधला असता समाधानकारक मदत मिळाली नसुन उसतोड मजुरांचे नेतृत्व करणारांनी आकाशचा खुन प्रकरणात न्याय मिळवुन देण्यासाठी सहकार्य करावे.


No comments:
Post a Comment