बीड जिल्ह्य़ातील आरोग्य विभागातील गैरव्यवहार प्रकरणातील आरोग्य विभागातील वरिष्ठ आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येऊन कोरोना कालावधीत आरोग्य विभागातील खर्चाचे ऑडीट करण्यात येऊन खरेदीची उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना केल्यानंतर उपआयुक्त( महसुल )विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद पराग सोमण यांनी जिल्हाधिकारी बीड यांना अर्जदार डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या निवेदनामध्ये केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रचलित कायदे, नियम, अद्ययावत शासन निर्णय, परिपत्रके व विषयांकीत प्रकरणात काही न्यायालयीन आदेश पारीत झाले असल्यास सदर न्यायालयीन आदेश इ.बाबी विचारात घेऊन नियमानुसार उचित कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीबाबत तक्रारदारास परस्पर कळविण्यात यावे असे पत्रक काढले आहे.
उपआयुक्तांच्या आदेशाची अवमानना
दि.२२ जानेवारी २०२२ रोजी प्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्य विभागातील गैरव्यवहार प्रकरणात खर्चाचे ऑडीट करण्यात येऊन खरेदीची उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांना तक्रार केल्यानंतर त्या अनुषंगानेच उपआयुक्त पराग सोमण यांनी जिल्हाधिकारी बीड यांना पत्रक पाठवले असून १५ दिवस होऊन सुद्धा अद्याप कोणतीही कार्यवाहीबाबत माहीती देण्यात आली नाही त्यामुळेच संबधित प्रकरणात वरिष्ठांच्या अवमानना केल्याबद्दल प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

No comments:
Post a Comment