Sunday, February 6, 2022
पत्ता विचारण्याचा बहाना करून वृध्दाच्या गळ्यातील सोन्याचे लाॕकेट हिसकावुन पसार बीड मधील घटना.
बीड : (प्रतिनिधी) रस्त्याने चालणाऱ्या एका वृद्धाला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याचा बहाना करून वृद्धाच्या गळ्यातील २१ ग्रॅमचे सोन्याचे लॉकेट हिसकावून पोबारा केल्याची घटना बीड शहरातील पालवण चौकात भर दुपारी गुरुवारी घडली . अशोक दत्तात्रय गिरी ( वय ६६ ) हे सेवानिवृत्त कर्मचारी शहरातील पालवण चौक सुवर्ण कॉलनी , बीड येथे जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात दोन अनोळखी इसमांनी त्यांना थांबवून पत्ता विचारण्याचा बहाना केला व त्यांच्या गळ्यात असलेले दोन तोळ्याची सोन्याची साखळी व एक ग्रॅमचे सोन्याचे पँडल हिसकावून दुचाकीवरून पळून गेले . वृद्धाने आरडाओरड केली मात्र जवळपास कोणी नसल्याने ते पळून जाण्यात यशस्वी झाले . या प्रकरणी शिवाजीनगर पोलीसात अज्ञात दोघांविरोधात ३ ९ २ , ३४ भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणाचा पुढील तपास पो . हवालदार घाणे हे करत आहेत .
No comments:
Post a Comment