बीड (प्रतिनिधी) नागसेन बुद्धविहारात मुकनायक दिन साजरा करण्यात आला असता कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. बिभीषण सिरसाठ सर तर प्रमुख पाहुणे म्हणून संपादक उत्तमजी हजारे साहेब, बालाजी जगतकर साहेब,नितीनजी जोगदंड साहेब,अनिलजी जाधव साहेब तर बीड नगरपरिषदेचे नगरसेवक गणेशजी वाघमारे साहेब यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले.अध्यक्ष पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर प्रा.गाडे सर यांनी मार्गदर्शन केले तर प्रमुख पाहुणे बालाजी जगतकर यांनी सर्व पत्रकारांच्या वतीने पत्रकारिता कशी असावी व स्वत:चे वृत्तपत्र का असावे या विषयावर डॉ.बाबसाहेब आंबेडकरांचे विचार मांडले बहुजनांवरील अन्याय,अत्याचार समाजापुढे मांडण्याचे एकमेव साधन म्हणजे वृत्तपत्र होय असे मनोगत व्यक्त केले.तसेच नगरसेवक गणेशजी वाघमारे साहेब यांनी बौद्ध विहारासाठी लागणा-या आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी सदैव तत्पर राहील असे आश्र्वासन दिले.प्रा.अशोक गायकवाड सरांनी गौतम बुद्ध व त्यांचा धम्म या ग्रंथाचे १००० प्रती वाटपा अंतर्गत मान्यवरांना ग्रंथाचे वाटप करण्यात आले.बाबासाहेब ओव्हाळ सरांनी थोर महापुरुष, समाजसुधारक ,धर्मप्रसारक यांनी निर्मित केलेल्या साहित्य,लेखन,व प्रथा जतन करणं हे समाजातील प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे आपण जर विचार अचाराने हे महापुरुष जिवंत ठेवले तरच पुढच्या पिढीला ते माहित होतील नाहीतर खोटा इतिहास ऐकुण त्यांचे पाईक होतील या साठी संपादक व पत्रकार बंधुंनी समाजासमोर वास्तव मांडण्याचा प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले.
शेवटी अध्यक्षीय भाषणात प्रा.बिभीषण सिरसाठ सरांनी मुकनायक म्हणजे मुक्या समाजाला वाचा फोडणारे वृत्तपत्र आहे त्यासाठी आपण सर्वांनी प्रत्येक वर्षी यांचा वर्धापनदिन साजरा करणे आवश्यक आहे असे मत मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब ओव्हाळ सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधाकर वाघमारे सर यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमास परिसरातील सुरवसे साहेब,(सरपंच)इंजि.उमाजी आठवले, पंडित सोनवणे (फौजी)आर, एम, वाघमारे, सुधाकर वाघमारे,उमाजी वाघमारे,प्रा.गाडे सर,साळवे साहेब,प्रा.अशोक गायकवाड,तानाजी शिनगारे साहेब, अँड.कल्याण जी गाडे साहेब असे अनेक बौद्ध उपासक, उपासिका उपस्थित होते.
No comments:
Post a Comment