* यु ट्यूब चा वापर करून स्पर्धा परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण होता येतात.--संतोष सुतार
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) संत तुकाराम विद्यालय, नागापूर येथे झालेल्या शिक्षण परिषदेच्या अध्यक्षतेस्थानी केंद्र प्रमुख ए. तु. कराड हे होते.प्रमुख अतिथी म्हणून चाटे पी. एम. (मुख्याध्यापक कन्या नागापूर,)सोळंके सर (मुख्याध्यापक संत तुकाराम),विजय कचरे (साधन व्यक्ती)हे उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना सर्व समावेशीत शिक्षणाचे साधन व्यक्ती विजय कचरे म्हणाले की,शाळेतील विविध प्रकारचे दिव्यांग, विकलांग, हे21प्रकारचे असतात. ते प्रतेक शिक्षकांना ओळखू आले पाहिजेत. त्यास बालमानास शास्त्र अवगत असावे लागते. जो शिक्षक बालमानास शास्त्र जाणतो तो यशस्वी शिक्षक होय.
या प्रसंगी यू ट्यूब चा चपलखपणे वापर करणारे संतोष सुतार म्हणाले की, शिक्षकांनी आधुनिक मीडिया चा वापर करून विद्यार्थ्यांना अध्यापन केले पाहिजे. आम्हीं केलेल्या मीडियाचा फायदा हे पश्चिम महाराष्ट्रात होतो आहे तर आपल्या कडे का नाही?
कस्ट करण्याची जिद्द जिथं जास्त असते तिथं यशस्वीता अधिक असते.
परिषदेचा समारोप करतांना केंद्र प्रमुख ए. तु. कराड म्हणाले की,
परिश्रम, सातत्य आणि चिकाटी मुळेच यश प्राप्त करता येते.
अनेक शिक्षकांनी अद्याप निर्गम रजिस्टर पूर्ण केलेले नाही याचाच अर्थ असा आहे की, आळस आपल्यात किती भिनला आहे.
ही परिषद अत्यंत वैचारिक, शिक्षकांना अंतर्मुख करायला लावणारी असू शकते असे विचार त्यांनी मांडले.नंदकुमार वायनगडे यांनी स्वागत गीत गायले.
सूत्रसंचालन नेहरकर यांनी तर आभार मधुकर पारध्ये सर यांनी मानले.
No comments:
Post a Comment