परळी वैजनाथ ;+ परळी येथील कांतीकारी साथी,जय महाराष्ट्र महिला संघटना व आईसाहेब जिजाबाई सेवा संस्थेच्या संयुक्त विद्यामाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड भारताचे दैवत छत्रपती शिवाजी (महाराज ) राजे यांची जयंती मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमाने साजरी होणार असल्याचे कांतीकारी साथीच्या मुख्यसंपादक व जय महाराष्ट्र महिला संघटनेच्या अध्यक्षा सौ.वर्षा मगर यांनी सांगितले.
मंगळवार रोजी छत्रपती शिवराय जयंती निमित्त आयोजित बैठकीत सौ.वर्षा मगर बोलत होत्या.त्यापुढे म्हणाल्या की छत्रपती शिवराय जयंती व राजमाता जिजाऊ जयंती ही आपल्या संस्थेची,संघटनेची वैशिष्टयेपुर्ण ओळख आहे.पण मागील काही वर्षापासून कोरोनाच्या कारणामुळे आपलेला मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेता आले नाहीत पण यावेळेस कोरोनाचे सर्व नियम पाळुण छत्रपती शिवराय जयंती मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरी करायची आहे.तरी सर्वानी हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी भारतरत्न स्व.लता मंगेशकर यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या बैठकीला जय महाराष्ट्र महिला संघटनेचे सर्व सदस्य,आईसाहेब जिजाबाई सेवा संस्थेचे सर्व सदस्य.महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते .
No comments:
Post a Comment