Tuesday, February 8, 2022

संजय निराधार योजनातील सर्व नियमबाहय लाभार्थी कमी करा -प्रा.लहूदस रोडे


* या नियमबाहय लाभार्थी चा निधी पात्र दिव्यांग बांधवाना वर्ग करा ;
 अन्यथा येत्या 24 तारखे पासून अमरण उपोषण 

परळी वैजनाथ  (प्रतीनिधी ) महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाकडून राज्यात संजय गांधी निराधार योजना आणि इंदिरा गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना राबविल्या जातात यात केवळ आणि केवळ  2002 ते 2012  च्या नियमबाहय डीआरडी यादीत  नांव समाविष्ट असल्यामुळें अनेक सदन आणि समर्थ नागरिक या योजना चा लाभ घेत आहेत त्यामुळे जे खरे पात्र नि:समर्थ‌ दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना सरसकट  1000 रूपये मानधनावर उपजिविका भागवावी लागत आहे त्यामुळे या नियमबाह्य  डीआरडी यादीतील परळी शहर व तालुका तील सर्व समर्थ व सदन लाभार्थी कमी करून पात्र नि:समर्थ‌ दिव्यांग लाभार्थी बांधवाच्या खात्यात वर्ग करण्यात यावा अशा आशयाची लेखी मागणी अखिल भारतीय दिव्यांग हित कारणी सभेचे च्या वतीनें परळीचे तहसिलदार तथा तालुका सचिव संजय गांधी निराधार योजना यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे अन्यथा येत्या 24 तारखे  पासून बेमुदत अन्न त्याग आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे

दरम्यान  2002 ते 2012 या काळातील डीआरडी यादीतील प्रत्येक पात्र लाभार्थीने केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या विविध योजनाचा लाभ घेतला आहे उदाहरणांत रमाई आवास योजना / इंदिरा गांधी आवास योजना / शबरी आवास योजना /सिंचन विहिरी /पाईप लाईन योजना / शेळीमेंढी . गायी म्हशी‌ योजना  / उज्वला गैस योजना /वीज कनेक्शन व शौचालय / मोफत वैदयकीय उपचार /इंग्रजी माध्यमाचे मोफत शिक्षण या आणि अशा अनेक वर्षांपासून या योजना चा लाभ घेतला आहे आणि आणखीही घेत आहेत तेव्हा भारतात 2002 ते 2012  पासून डीआरडी सर्वे झाला नाही किंवा 2002 2012 च्या यादीला केंद्र सरकारने अधिकृत शासन निर्णया व्दारे किंवा परिपत्रकानुसार मुदत वाढ दिली नाही त्यामुळे या नियमबाह्य समर्थ नागरिकांना या सर्व योजनांमधून कमी करून पात्र नि:समर्थ‌ दिव्यांग बांधवाच्या खात्यात हा निधी वर्ग करण्यात यावा अन्यथा येत्या 24 तारखे पासून बेमुदत अन्न त्याग आंदोलन करण्यात येईल अशा आशयाची लेखी मागणी परळीचे तहसिलदार तथा तालुका सचिव संजय गांधी निराधार योजना यांच्या कडे अखिल भारतीय दिव्यांग हित कारणी सभेचे अध्यक्ष प्रा. लहूदास रोडे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे यावर यशवंत रोडे ,शिवाजी रोडे , विशाल रोडे , सोमनाथ फड भागवत मुंडें आणि सुधाकर फड आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment