* जिजामाता गार्डन क्लब परळीच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त लेकींचा सत्कार.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) प्रजाहित जाणणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्या माऊलीने घडविला. त्या राजमाता जिजाऊच्या भूमितून सर्वांना कायमच प्रेरणा मिळत आली. कणखर राजमाता आणि लोकमाता म्हणूनही जिजाऊंकडे पाहीले पाहीजे, जिजाऊंची दुरदृष्टी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा बीड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयकुमार उर्फ पप्पू ठक्कर यांनी केले. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या जिजाऊंच्या लेकींचा पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.
राजमाता जिजाऊ जयंती निमित्त राणी लक्ष्मीबाई टावर चौकात असलेल्या जिजामाता गार्डन क्लबच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान आज बुधवार दि.12 जानेवारी 2022 रोजी राजमाता जिजाऊ यांच्या पुर्णाकृती पुतळयास श्री.ठक्कर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या जिजाऊंच्या लेकींचा पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना अभयकुमार ठक्कर यांनी म्हटले की, जिजाऊ जयंती हा एक जिजाऊ प्रेमींसाठी उत्साहाचा दिवस आहे. संकटाला सामोरे जायला कणखर पणा लागतो. संकटं झेलण्याची शक्ती लागते. ती शक्ती तो कणखरपणा राजमाता जिजाऊंनी शिवरायांना दिला आणि तोच संदेश आपल्यासाठी देखील आहे. त्यामुळे जिजाऊंच्या विचारांची प्रेरणा प्रत्येकांने घ्यावी, असे ते म्हणाले.
कार्यक्रमास जिजामाता गार्डन क्लबचे अध्यक्ष ब्रीजलाल मुंदडा, सचिव मुंडे, विकासदादा डुबे, रामप्रसाद मोदाणी, बाबुराव ताटीपामल, वासुदेेव पाठक, रेपे, जी.आर. डोंगरे, माजी उपनगराध्यक्ष भाऊराव भोयटे, धीरज गोहील, अनिल उदगीरकर, काकाणी, गादीया, लिखे, अवस्थी सर, अंबेकर, बदाले, स्वामी यांच्यासह सर्व सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते. सदरील कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम व अटींचे पालन करून करण्यात आला.
No comments:
Post a Comment