सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्ती बीड मुख्यालयाच्या ठिकाणी आज संपादक सेवा संघ महाराष्ट्र राज्य मुंबई बीड जिल्ह्याचे नव नियुक्त जिल्हाध्यक्ष झाले ,निर्भिड बाणा, उपेक्षित, वंचित,बहुजन समूहातील जनतेच्या न्याय हक्कासाठी लेखनी झिजवणारा, हरहुन्नरी पत्रकार, तथा संपादक प्रा.बालाजी जगतकर जन्मभूमी परळी कर्मभूमी बीड निर्मान केलेले भूमिपुत्र, बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभागी असणारे, उच्च विद्या विभूषीत तथा अभ्यासू, शांत, सुसंस्कृत, मृदूभाषी, मनमिळावू व्यक्तिमत्त्वाचे, अतिशय दिलखुलास व्यक्तीमत्व म्हणून छाप पाडणारे आहे,एक समता सैनिक सा.बीड अक्षरधामचे मुख्यसंपादक तथा दैनिक जनसागर मुख्य संपादक, नागरी संरक्षण समितीचे बीड जिल्हा कार्यध्यक्ष, संघमित्रा सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष तथा संकल्प सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते प्रा.बालाजी श्रावण जगतकर आज यांच्या वाढदिवसा निमित्त विशेष लेख वाचकांसाठी देत आहोत.
प्रा. बालाजी जगतकर हे सामाजिक/ धम्मकार्यक्षेत्रा बरोबरच पत्रकारितेतील क्षेत्रात पण नावलौकिक करणारे व सामाजिक जाण जपणारे नेतृत्व आहेत. दर्पण दिनानिमित्त राजे यशवंतराव होळकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त,अनेक पुरस्कारांनी सन्मानित,कोरोना काळा पायाला भिंगरी बांधून वाडी-वस्ती तांडा वर जाऊनअन्नधान्याच्या बातम्या करूनसर्वसामान्य ते शासना पर्यंत पाठवण्याचे काम केले आहे.
अल्पावधीतच आपल्या निर्भिड पत्रकारितेच्या व समाजसेवेच्या जोरावर लोकप्रिय झालेले, लोकांवर प्रभुत्त्व असलेले, पत्रकारितेतील चाणक्य असूनही स्वतःला समाजसेवेत झोकून देणारे सेवक असं व्यक्तिमत्व म्हणजे प्रा.बालाजी जगतकर. 12 जानेवारी 1976 या दिवशी जन्मदिवस आहे, आपण बऱ्याच सामान्य व गोर,गरीब, होतकरू लोकांचे चरित्र पत्रकारितेच्या माध्यमातून रेखाटलं आहे. पहिल्या भेटीतच त्यांची वाक्चातुर्यता, विद्वत्ता आणि त्यांच्या परखडपणाची चुणूक कुठल्या ही व्यक्ती ला लागते. आपल्या समाज सेवेने आणि संवादाने आपण मोठमोठ्याना भंडावून सोडतात. अचूक ठिकाणी लक्ष्यभेद करतात, मार्मिकता, विडंबन,परखडता हजरजबाबी ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्टय. समाज माध्यमांचा उपयोग त्यांनी योग्य पद्धतीने करत अनेक एक घटना, विकृतीवर प्रकटपणे मत मांडलं आहेत, व्यक्त केला आहे व त्याचा परिणामही दिसून आलेले आहेत. प्रा.बालाजी जगतकर यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी यांना बऱ्याच वेळा जनतेच्या प्रश्न वर घाम फोडला आहे. तसेच त्यांनी अनेक राजकरणी, अधिकारी घडविले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न नेहमीच आपल्या लेखणीच्या माध्यमातून शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देणारे संपादक प्रा.बालाजी जगतकर आहेत.पत्रकारितेत आपली आगळीवेगळी छाप प्रा.बालाजी जगतकर सर यांनी पाडलेली आहे. त्यामुळे त्यांचा जिल्ह्यासह राज्यभरात मोठा मित्रपरिवार आहे. सरळ, साधा स्वभाव आणि प्रत्येकाच्या अडीअडचणीला मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रा.बालाजी जगतकर हे सर्व परिचित आहेत. वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून त्यानी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जबाबदारी भुमिका पार पाडली, परत जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यामुळे त्यांची ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शना खाली जडण-घडण झाली आहे. सर्वसामान्यांसाठी अहोरात्र झगडणाऱ्या ते सामाजिक दायित्व आहेत. सामाजिक,धर्मकार्यात असो की सुख दुखात असो सामाजिक कार्यास हातभार लावण्यासाठी व आपले कर्तव्य बजावण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असतात.पत्रकारिता, सामाजिक,धम्मकार्य क्षेत्रात जिल्हाभरात आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. सतत नाविण्यपूर्ण उपक्रम राबवतानाच समाजातील गरजूंसाठी मदतीचा हात देण्यासाठी प्रा.बालाजी जगतकर झोकून देवून काम करत असतात. कोणतेही काम असो असे एक ना अनेक उपक्रम राबवून आपणही समाजाचे काही देणे लागतो या भूमिकेतून सातत्याने शक्य होईल तितके आपले योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे म्हणूनच त्यांचे नाव आदराने घेतले जाते. सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला अखंडितपणे विजेचा पुरवठा व्हावा यासाठी त्यांनी पेपरच्या माध्यमातून योगदान देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. तसेच कामगारांच्या विविध मोर्चे आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्यासाठी वृत्तपत्राच्या माध्यमातून शासन दरबारी मांडण्याचं काम ते अविरतपणे करत असतात. जिवघेण्या कोवीडच्या काळा मध्ये तीन महीने जिवाची परवा नकरता बीड जिल्ह्यातील अनेक खेड्या पाड्यात,जाऊन गरजवंतांना, गरिब,मजुरांना, किराणा किट व अन्नधान्य वाटपात सक्रिय सहभाग नोंदवला, दुर्लक्षित उपेक्षित वंचित कुटुंबांसाठी विशेष असं सहकार्य शासनाकडून मिळवून दिले.बीड शहर मुख्यालयाचे जात पडताळणी विद्यार्थी शिष्यवृत्ती रमाई घरकुल आवास योजनेतील त्रुटी तसेच जिल्हा माहिती कार्यालयातील संपादकाच्या संदर्भात एक हक्काचा माणूस त्यांच्याकडे बघतात.
प्रा.बालाजी जगतकर यांचा 12 जानेवारी रोजी वाढदिवसशालेय साहित्य व पुस्तके वाटप,सामाजिक उपक्रमने तसेच वृक्षारोपण राबवुन साधेपणाने साजरा होणार आहे. सामान्य माणसाच्या अडीअडचणी वृत्तपत्राच्या माध्यमातून तसेच सदैव रस्त्यावर उतरून काम करणारा आणि जिल्ह्यात, तालुक्यात सर्वाधिक जनसंपर्कात असलेला व्यक्तीमत्व म्हणून ओळख आहे. काम घेऊन आलेल्यांचे तात्काळ काम करण्याची त्यांची पद्धत आणि आपुलकीने बोलण्याच्या स्वभावावामुळे, प्रत्येक माणसाला ते आपलेसे वाटतात. त्यांच्याविषयी कोणी वाईट बोललेले लोकांनाच आवडत नाही. आपली कोणतीही अडचण प्रा.बालाजी जगतकर यांना सांगितल्यास ती अडचण सोडविण्यासाठी किंवा नक्की सुटेल असा विश्वास त्यांच्या संपर्कात आलेल्याना वाटतो. प्रा.बालाजी जगतकर यांनी सातत्याने ग्रामिण तसेच शहरी भागातील गोरगरीब जनतेच्या हिताला प्राधान्य दिले आहे. ग्रामिण/ शहरी भागातील विकासाचे विविध प्रश्न आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने शासनाकडे मांडले आहेत. धार्मीक, सामाजिक, राजकीय, शिक्षण, विविध सांस्कृतिक, धम्मकार्यात तसेच साहित्यीक उपक्रमात प्रा.बालाजी जगतकर यांचा सातत्याने सक्रिय सहभाग राहिला आहे. प्रा.बालाजी जगतकर यांना उदंड,निरोगी दिर्घायुष्य लाभावे व त्यांच्या हातुन पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेची यापुढे ही अखंड सेवा घडावी अशी अपेक्षा तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी प्रार्थना व अशीच निर्भीड पत्रकारिता त्याच्या कडून सदैव होत राहावे हीच माफक अपेक्षा......
प्रा. विष्णू जाधव
लेखक, साहित्यिक, बीड
No comments:
Post a Comment