
Monday, January 31, 2022
गांधीजींच्या विचारांचे प्रतीक नवीन माकड सामाजिक कार्यकर्ते बसविणार - डॉ. संजय तांदळे
*महात्मा गांधींच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन व स्वच्छता मोहीम संपन्न !
बीड (प्रतिनिधी) - रविवार दिनांक 30 जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने गांधीजींच्या पुतळ्यासह त्यांच्या विचाराचे प्रतीक असलेल्या तीन माकडांच्या प्रतिकृतीला सुद्धा पाण्याने अंघोळ व फुलहार घालून अभिवादन करण्यात आले. तसेच जवळपासच्या परिसरातील साफसफाई मोहीम बीड नगर परिषद प्रशासनाकडून करून घेण्यात आली.
अभिवादनानंतर सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, अज्ञात माथेफिरूने महात्मा गांधीजींच्या विचारावर हल्ला करत "बुरा मत देखो" चा संदेश देणार्या माकडाची तोडफोड करून आता जवळपास वर्ष होत आले आहे. या एक वर्षामध्ये सदरील तोडफोड करणाऱ्या माथेफिरू चा माग काढून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता आतापर्यंत सामाजिक कार्यकर्त्यांनी तीन वेळा आंदोलने केली. जिल्हा प्रशासन, नगरपालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आली. परंतु यापैकी कोणत्याही प्रशासनाने आतापर्यंत याची गांभीर्याने नोंद घेतली नाही की, तोडफोडप्रकरणी आतापर्यंत ना कुणावर गुन्हा नोंद केला, ना तोडफोड करणाऱ्या माथेफिरू ला पकडण्यासाठी कुठले पाऊले उचलण्यात आली, ना माकडाची नवीन प्रतिकृती आणून बसविण्यात आली. यामुळे आज महात्मा गांधींच्या पुण्यतिथी निमित्ताने आपण सर्व सामाजिक कार्यकर्ते मिळून पैसे जमा करूत आणि तोडफोड केलेल्या माकडाची प्रतिकृती येथे आणून बसवू असे म्हटले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे यांच्यासह आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक अशोक येडे, प्रा. बाळासाहेब शिंदे, जाधवर, ज्येष्ठ नागरिक कोलेकर, सादिक भाई यांच्यासह आम आदमी पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा,शिवराज बागंर यांच्यावरतीच एमपिडीची कारवाई का?--प्रमेश्वर माळी
"गोपाळ समाज करणार समाजकल्याण मंञ्याच्या घरासमोर जागरण गोधंळ "
बीड (प्रतिनिधी) उसतोड कामगारांचे नेते समाजसेवक प्राध्यापक शिवराज बांगर यांच्यावरती एमपिडी सारखी कारवाई करून त्यांना खोट्या गुन्हयात गोवण्यात आले आहे त्यांना पुढे राजकारणात समोर न येऊ देण्यासाठी त्यांच्यावरती खोटे आरोप केलेले आहेत असा आरोप गोपाळ समाजहीत महासंघ बीड जिल्हा संपर्क प्रमुख प्रमेश्वर माळी यानी केला आहे
भारत देशामध्ये स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नंतर ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरती आवाज उठवणारा एक साधा सरळ आणि अत्यंत मनमिळावू अन्यायाला वाचा फोडणारा कार्यकर्ता म्हणजे प्राध्यापक शिवराज बांगर साहेब असुन ऊसतोड कामगारांसाठीच नाही तर इतर गोरगरीब जनतेसाठी तत्पर असणारा एक कर्तुत्ववान असा नेता आहे
अठरा पगड जातींना एकत्र घेऊन सर्व जाती धर्माला सोबत घेवुन विश्वभुषण छत्रपती शिवाजी महाराज , विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले , छञपती शाहू राजे, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे थोर विचार मनात ठेवून चालणारा गोरगरिबांचा हा एक प्रेमळ आणि दबंग नेता आहे सामाजिक चळवळीत काम करत असलेल्या प्रा,शिवराज बागंर यांच्यावरती राजकिय सुडबुध्दीने कारवाई करण्यात आली असुन ही कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी अन्यथा समाजकल्याण मंञ्याच्या घरासमोर जागरण गोधंळ घालण्याचा ईशारा गोपाळ समाजहित महासंघ बीड जिल्हा संपर्कप्रमुख परमेश्वर माळी यांनी केली आहे
राज्यातील दहावी व बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार - ना.वर्षा गायकवाड .
मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जानेवारीमध्ये शाळा बंद करण्यात आल्या होत्या परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे शाळा पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. शाळा बंद करण्यात आल्यामुळे अभ्यासक्रम शिकवून झाला नाही. तसेच परीक्षांबाबत खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पालकांना आवाहन केलं असून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार आहेत, असे स्पष्टीकरण रविवारी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले. सध्या दहावी, बारावी परीक्षांच्या वेळापत्रकावरून विद्यार्थी आणि पालकांमध्ये बराच गोंधळ आहे. त्यावर शिक्षणमंत्र्यांनी खुलासा केला.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या आयोजनासंदर्भात कुणीतरी खोटी बातमी पसरवली होती. विद्यार्थी, पालक आणि शाळांनी त्यावर विश्वास ठेऊ नये. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ज्या तारखेला आहेत, त्याच तारखेला घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.
राज्य सरकार आणि शिक्षण विभागाच्यावतीने आम्ही कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. ठरलेल्या परीक्षांच्या कार्यक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जे विद्यार्थी कोरोना काळात परीक्षेला बसू शकणार नाहीत त्यांच्यासाठी सप्लिमेंट्री परीक्षा घेण्यात येणार आहे, असेही यावेळी वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. दहावी बारावीच्या परीक्षा कधी होणार हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी मुख्याध्यापकांनी केली होती.
शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत ऑनलाईन बैठक घेऊन दहावी बारावीच्या लेखी, प्रात्यक्षिक आदी परीक्षा यांची तयारी, नियोजन आदींचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची देखील माहिती घेतली होती. यावेळी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेले नसल्याने मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार्या दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
अहिल्यादेवी होळकर अभिवादन सभेतून धनगर समाज संघटित होत आहे ही अभिमानाची गोष्ट.माजी सभापती गणेश शिंदे.
धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी जिवाचे रान करुत पण समाजाला न्याय देऊत -.प्रकाश सोनसळे
बीड (प्रतिनिधी).अभिवादन पर सभेचे आयोजन धनगर समाज युवा मल्हार सेना बीड जिल्हा यांच्या वतीने नियमित प्रत्येक रविवारी आयोजित करण्यात आले आहे..
राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर साप्ताहिक अभिवादन सभेचा आजचा अकरावा रविवार आहे .या कार्यक्रमाचे आयोजन धनगर समाज युवा मल्हार सेना महा राज्य सरसेनापती मा.प्रकाश भैय्या सोनसळे यांनी केले होते आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या अभिवादन सभेने राजमातेच्या सत्कर्याला उजाळा मिळेल. व या अभिवादन सभेतून समाज संघटित कसा होईल यासाठी आपन सर्व जन हा उपक्रम राबवत आहेत*
*बीड शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुतळ्याचे अभिवादन मा.श्री.गणेश शिंदे माजी सभापती पंचायत समिती वडवणी,प्रा.प्रदिप रोडे संचालक तुलशी इंग्लिश स्कूल बीड, हनुमंत काळे साहेब, महादेव राहीज, अशोक पांढरे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले
व राजे यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमा पूजन ॲड राज पाटील लढा दुष्काळाशी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, अंकुश गवळी युवा पत्रकार, महादेव हजारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
आजआपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा अभिवादन कार्यक्रम करण्यात आला आहे
या कार्यक्रमास संबोधित करताना मा.श्री गणेश शिंदे माजी सभापती पंचायत समिती वडवणी यांनी बोलताना सांगितले आहिल्यादेवी होळकर अभिवादन सभेतून धनगर समाज हा संघटित होत आहे ही या अहिल्यादेवी होळकर सभेची ताकत आहे
या कार्यक्रमास संबोधित करताना प्रकाश भैय्या सोनसळे यांनी सांगितले धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी जिवाचे रान करुत पण समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही
यावेळी हनुमंत काळे साहेब, नारायण भोंडवे सरपंच,अशोक पांढरे साहेब, प्रा. प्रदिप रोडे साहेब, ॲड. राज पाटील, सोपान गावडे माजी सरपंच,महादेव गावडे साहेब, ॲड.रंजित करांडे साहेब,महादेव हजारे साहेब ग्रामसेवक, इंजि.मनोज पुजारी साहेब,रोहीत काळे साहेब, अंकुश गवळी युवा पत्रकार,गुरव सर, विजय घोंगडे,युवराज भंडगर, आदी समाज बांधवांनी वेळेवर उपस्थित राहुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे साप्ताहिक (पुजा) व राजे यशवंतराव होळकर प्रतिमा पूजन अभिवादन, आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पार पाडून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी आपला आभारी आहे
सारडगाव येथे दिव्यांग मनोज गायकवाड यांचे दुकान आगीत भस्मसात.डॉ. संतोष मुंडे यांची घटनास्थळी भेट.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मौजे सारडगाव येथे दिव्यांग बांधव यांचे मनोज राजेंद्र गायकवाड यांच्या किराणा व जनरल स्टोअर्सला अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण दुकान आगीत भस्मसात झाले. दिव्यांग बांधवांचा आधार असलेल्या कुटुंबाचे दुकान संपूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले व अंदाजे 2 लाख रूपयांचे मोठे नुकसान झाले. ही माहिती समजताच दिव्यांगाचे कैवारी डॉ. संतोष मुंडे यांनी आज रविवार, दि.30 जानेवारी रोजी तातडीने घटनास्थळी प्रत्यक्षात भेट देऊन पाहणी केली. तसेच तलाठी यांच्या मार्फत पंचनामा करून घेतले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग विकास महामंडळाच्या वतीने लवकरच दिव्यांग बांधवांस मदत दिली जाणार आहे. असे डॉ.संतोष मुंडे यांनी सांगितले. तसेच दिव्यांग कुटुंबाला आधार दिला.
सारडगाव येथे दिव्यांग मनोज राजेंद्र गायकवाड यांचे अचानक लागलेल्या आगीत किराणा व जनरल स्टोअर्स आगीत भस्मसात झाले. दिव्यांग बांधव मनोज गायकवाड यांचे किराणा व जनरल सटोअर्स या दुकानाचे अंदाजे दोन लाख रुपये पेक्षा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामध्ये दुकानातील ,सर्व भरलेला माल व फर्निचरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दिव्यांगाचे कैवारी डॉ. संतोष मुंडे यांनी सारडगाव येथे जाऊन नुकसानग्रस्त दुकानाची पाहणी केली. दिव्यांग बांधव मनोज गायकवाड यांना धीर दिला. तसेच डॉ. संतोष मुंडे यांनी तातडीने तलाठी यांच्या मार्फत तात्काळ पंचनामा करून घेतला तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग विकास महामंडळाच्या वतीने लवकरच दिव्यांग बांधवांस मदत दिली जाणार आहे. असे डॉ.संतोष मुंडे यांनी सांगितले. तसेच दिव्यांग कुटुंबाला आधार दिला. यावेळी डॉ. संतोष मुंडे यांच्यासह युवा नेते संजय आघाव,ज्ञानेश्वर मुंडे, संजय तांदळे, रामभाऊ बोबडे, राहुल आघाव, भगवान आंधळे, अनंत गायकवाड, दिलीप तांदळे, राम बोबडे, भानुदास तांदळे, दगडू अघाव,दिलीप गायकवाड,मनोज गायकवाड,आमोल गोलेर, आश्रुबा गवळी,रजेभाऊ सतभाई,दगडू अघाव,दिलीप गायकवाड,मनोज गायकवाड,आमोल गोलेर, आश्रुबा गवळी,रजेभाऊ सतभाई व इतर उपस्थित होते.
Sunday, January 30, 2022
अजुन किती दिवस खोट्या गुन्ह्यात प्रा शिवराज बांगरांना जेल मध्ये ठेवाल--विवेक कुचेकर .
" सामाजिक न्यायमंञ्याच्या जिल्हयात चळवळीतील कार्यकर्ते तुरूंगात टाकण्याचा प्रयत्न "
बीड (प्रतिनिधी)वंचित बहुजन आघाडी उसतोड कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा समाजसेवक प्रा, शिवराज बांगर यांना खोट्या MPDA झोपडपट्टी दादा कायद्याखाली अटक केले आहे, ते गेल्या पंधरा दिवसा पासुन न केल्याली गुन्हयाची सजा भोगत आहेत, हा त्यांच्यावरील अन्याय आहे, त्यांच्या वर झालेल्या अन्यायला वाचा फोडण्यासाठी सकल बहुजन समाजाने रस्त्यावर उतरले पाहिजे, झोपडपट्टी दादा कायदा म्हणजे काय तर एकाद्या झोपडपट्टीत दहशत पसरवणे, मटका, जुगार , दारू विकणे, हात भट्टी तयार करणे, वाळु तस्करी वाळु माफीया अशा व्यक्तींन वर MPDA झोपडपट्टी दादा कायदा लागु होतो , परूतु प्रा, शिवराज बांगर यांचे अशे एकही वर्तन नाही किंवा वरील पैकी कुठेही त्यांचे अशा धंदे नाहीत, परंतु कुनाच्या सांगण्या वरून प्रा शिवराज बांगर यांना झोपडपट्टी दादा कायद्यात आडकुन त्याना जेल मध्ये बंदिस्त केले आहे,बीड जिल्ह्यातील गोरगरिब जनतेला मायचा हात देणारे प्रा शिवराज बांगर यांच्या वर झालेल्या खोट्या MPDA कार्यवाहीचा सर्वञ निषेध होत आहे, पोलीस प्रशासन, जिल्हाअधीकारी, तहसिलदार या सर्वांना विविध पक्ष संघटनाच्या वतीने निवेदन दिले आहेत, पण कुठेही प्रा शिवराज बांगर यांच्या खोट्या गुन्ह्यातुन सुटका होईल अशे दिसत नाही,जिल्हा अधीकार्यांची हालचाल दिसत नाही, त्यामुळे गोरगरिब जनतेत प्रचंड नाराजी आहे, अशे खोटे गुन्हे दाखल झाले तर सर्वसामान्य जनतेसाठी कुनी ही रस्त्यावर उतरणार नाही, प्रा बांगर यांच्या वर झालेल्या खोट्या MPDA कार्यवाहीने सर्वसामान्य सामाजीक चळवळीतील कार्यकर्त्या मध्ये दहशत निर्माण झाली आहे, त्यामुळे जिल्हा अधिकारयाना आम्ही आव्हान करत आहोत की अशे खोटे गुन्हे खपवुन घेतले जानार नाहीत, त्यामुळे प्रा शिवराज बांगर यांच्या वरील खोटी MPDA तात्काळ मागे घ्यावी अन्यथा आगामी काळात बीड जिल्हा प्रशासनाच्या विरोधात लोकशाही मार्गाने लढावे लागेल बीड जिल्हा आधीकार्यांनी आमच्या सहनशिलतेचा अंत पाहु नये
तसेच महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायमंञ्याच्या जिल्हयात चळवळीतील कार्यकर्त्यावर झोपडपट्टी दादा कायद्या अंतर्गत कारवाई होत असेल तर हे दुर्दैव आहे
सामाजिक न्याय देण्याच्या ऐवजी चळवळीत काम करणारे संपवले जात असतील तर आगामी काळात याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा ईशारा वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका प्रसिद्धी प्रमुख विवेक (बाबा )कुचेकर यांनी दिला
चौसाळा येथील पत्रकार विकास नाईकवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी पुरस्कार प्रदान.42 वर्ष सेवा देणाऱ्या पोस्टमॅन रामकिसन नाईक यांना पूर्ण पोशाख व ट्रॉफी देऊन केला सन्मान.
चौसाळा (प्रतिनिधी) चौसाळा येथील पोस्ट ऑफिस मधील गेली 42 वर्षे सेवा देणारे पोस्टमन रामकिसन नाईक यांना चौसाळा येथील सामाजिक उपक्रम राबविणारे पत्रकार विकास नाईकवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी पुरस्कार 2022 हा पुरस्कार दिनांक 26 जानेवारी रोजी झेंडावंदन झाल्यानंतर चौसाळा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंचपती मधुकर तोडकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव मोठे ग्रामसेवक बाबासाहेब चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला .
यावेळी 42 वर्षे सेवा देणारे पोस्टमन पोस्टमध्ये आलेले महत्वाचे कागदपत्र स्वतः घरी जाऊन प्रत्यक्ष त्या व्यक्तीच्या हातातच देतात व गाडी सायकल असे काहीही चालवता येत नसल्याने पाई चलत 42 वर्ष सेवा देत आहेत या सेवेमुळे सामाजिक उपक्रम राबविणारे पत्रकार विकास नाईकवाडे यांच्यातर्फे रामकिसन नाईक यांना संपूर्ण पोशाख एक ट्रॉफी शाल नारळ फेटा देऊळ त्यांचा मानसन्मान केला हा सन्मान व पुरस्कार 42 सेवा देणाऱ्या व्यक्तीला देण्याचे काम व चौसाळा येथे विविध उपयोगी सामाजिक उपक्रम राबविण्याचे काम पत्रकार विकास नाईकवाडे हे सतत करत असतात असे उपस्थित गावातील नागरिकांनी म्हटले यावेळी सरपंचपती मधुकर तोडकर वैद्यकीय अधिकारी डाॅ. वैभव मोटे ग्रामसेवक बाबासाहेब चव्हाण व्यापारी आनंद लोढा, अशोक जोगदंड, उद्धव नाईकवाडे ,उमेश जोगदंड, गणेश कुलकर्णी ,बापू पवार पत्रकार अमोल तांदळे, सगळे सर ग्रामपंचायत मधील कर्मचारी प्रभू पिसाळ, ईसाक शेख ,मनोज वाघमारे, राम मस्के, भोसले मॅडम उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाला उपस्थितांचे पत्रकार विकास नाईकवाडे यांनी आभार मानले.
पत्रकार आसाराम कांदे यांचे अपघातात निधन.
बीड(प्रतिनिधी)-माजलगाव तालुक्यातील चोपनवाडी येथील आसाराम कांदे हे शुक्रवारी रात्री धारुरहून चोपनवाडीकडे मोटारसायकलवरुन जात असताना तेलगाव येथील माजलगाव साखर कारखान्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले. डोक्याला व दोन्ही पायांना मार लागल्याने त्यांच्यावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्रीच त्यांचे निधन झाले. शनिवार दि.29 जानेवारी रोजी चोपनवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
माजलगाव तालुक्यातील चोपनवाडी येथील आसाराम कांदे यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारीता क्षेत्रात काम करताना त्यांनी समर्थ लोकनेता, लोकजगत बरोबरच लोकपत्रचे तेलगाव वार्ताहर म्हणुनही काम केले आहे. पाणलोट क्षेत्र, शेळी पालनासह विविध प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करुन बरोजगारांना रोजगाराच्या संधीही आसाराम कांदे यांनी उपलब्ध करुन दिल्या होत्या. आसाराम कांदे हे शुक्रवारी रात्री आठच्या दरम्यान धारुरहून चोपनवाडी कडे मोटारसायकलवरुन जात असताना तेलगाव येथील माजलगाव सहकारी साखर कारखान्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने कांदे यांच्या डोक्याला व दोन्ही पायांना गंभीर मार लागला. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान रात्रीच त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर शनिवार दि. 29 जानेवारी रोजी चोपनवाडी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून आत्महत्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी आरोपीस तीन वर्ष शिक्षा.
माजलगाव (प्रतिनिधी) दि. २९.०१.२०२२ रोजी माजलगाव येथील अपर सत्र न्यायाधीश श्री एम. पी. देशमुख साहेब यांनी सदर प्रकरणातील आरोपी विकास उर्फ शेरकर शुक्लव ता. माजलगाव, जि. बीड याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला व तिला आत्महात्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीस स सक्त मजुरीची शिक्षा व एकुण ३०,००० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली या प्रकरणी सदा सरकारी वकील श्री. आर.अ. नापमारे यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहीले. या प्रकरणी थोडक्यात माहिती अशी की, यातील फिर्यादी पिडीत मुलगी शाळेत जाता येता वेळी विकास साधु शेरकर
लिंबगाना नेहमी पिडीतेचा पाठलाग करत असेन पिढीवेला नेहमी वेडा होता म पिढीतेला म्हणायचा माझ्या सोबत पत
जात असे म्हणायचा,
दिनांक २६/०९/२०१६.२७/०९/२०१६ व २८/०९/२०१६ या तीन दिवसापासून देवखेडा येथे आला होता व तीन दिवस सारखा पिडीतेचा पाठलाग करायचा माझे सोबत चल मला पळुन जाऊ असा म्हणु लागला त्यामुळे पिडीतेची बदनामी झाली ने पिडीतेला सहन होत नव्हते तो तिला फोनद्वारे फोन करून अति त्रस देवु लागला म्हणुन पीडीतेने दिनांक २९/०९/२०१६ रोजी दुपारी ०२.३० वापरी येथे घरातील सर्व जण दस-याने धुणे घेऊन नदीला गेले होते घरी कोणी नव्हते तेव्हा तिने अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून घेतले आहे. विकास शेरकर यांचे त्रासाला कंटाळुन पीडीतेने जाळुन घेवले.
म्हणून पिडीतेच्या मुत्यूपूर्वी जवाबावरून पोलीस स्टेशन माजलगाव शहर येथे गुरनं. ९२/२०१६ कलम ३५४३०६ भादंनी व बाल लैगीक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने कलम १२ प्रमाणे गुन्हा नोंद झाला व तपासानंतर आरोपी विरूध्द माजलगांव येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले प्रस्तुत प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकुण ०८ साक्षीदार तपासण्यात आले यामधील भगत पिडीतेचा जबाब तिचे नातेवाईक, घटनास्थळावरील पंच व तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक टी.व्ही. शिनगारे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. विशेष न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यावरून मा. श्री. एस. पी. देशमुख विशेष न्यायालयाचे न्यायाधीश माजलगाव यांनी आरोपी विकास उर्फे वाध्या साधु शेरकर यांस भादंविचे कलम ३५४(८) व १२ पोक्सो नुसार दोषी वर्षे व दहा हजार दंड, दंड न भरल्यास एक वर्ष साथी कैद ३०५ प्रमाणे दोषी धरून ३वर्ष शिक्षा व दंड न भरल्यास २ महिने साधे कैद, दंडातील २८,०००/- पडितीचे बहीण यांस नुकसान भरपाई पोटी व सरकार जमा २,०००/-रु. असे आदेश देण्यात आले.
या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने वरिष्ठ सहा. सरकारी वकील श्री. आर.अ.वाघमारे यानी काम पाहिले. व सहा. सरकारी वकील श्री. पी.एन.मस्कर, श्री. एन.एस.पाटील व पैरवी अधिकारी श्री. जालिंदर बान्हळकर, पी. डी. नरवडे यांनी मोलाचे सहकार्य केले.
(आर.अ. वालमारे) सहा, सरकारी वकील माजलगांव
परळीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी भाजपला साथ द्या-खासदार डॉ.प्रितमताई मुंडे.
* नगरसेवक प्रा.पवन मुंडे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्र.13 मध्ये ई-श्रम कार्डचे वितरण.
परळी वैजनाथ, (बातमीदार) - परळी शहरात परिवर्तन घडवून आणण्यासाठी भाजपला साथ द्या असे आवाहन खासदार डॉ.प्रितमताई मुंडे-खाडे यांनी केले.
परळी शहरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपचे नगरसेवक प्रा.पवन मुंडे यांनी शुक्रवारी (दि.28) आयोजित केलेल्या ई-श्रम कार्ड वितरणाच्या कार्यक्रमात खासदार डॉ.मुंडे बोलत होत्या. या कार्यक्रमास वैद्यनाथ देवस्थान संस्थेचे सचिव राजेश देशमुख, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष विनोद सामत, माजी अध्यक्ष अशोक जैन, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, महिला आघाडीच्या डॉ.शालीनीताई कराड, युवक नेते महादेव इटके, किशोर केंद्रे, जेष्ठ नेत्या सुशिला फड, सुचिता पोखरकर, नंदा पुरभुज, नरसिंग सिरसाट, सचिन गित्ते, पवन मोदाणी,अनिश अग्रवाल,पवन तोडकरी, विजयकुमार खोसे, , विशाल मुंडे , राजेश आघाव, दीपक नागरगोजे विशाल कराड कानाकेंद्रे, आकाश मुंडे, बाळासाहेब फड, सुरेश सातभाई, विशाल मुंडे, गणेश स्वामी, महेश मुंडे, दीपक धुमाळ, कारभारी शिंदे, पवन तोडकरी, विशाल जाधव, किरण शिंदे, सचिन साखरे, योगेश गोमचाळे, नवरतन शर्मा यांच्यासह प्रभागातील नागरिक, महिला उपस्थित होत्या.
खासदार डॉ.प्रितमताई मुंडे म्हणाल्या, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात परळीसह जिल्हयाच्या विकासासाठी विविध विकास योजना खेचून आणल्या आहेत, त्याचे नारळ फोडण्याचे काम आज चालू आहे, विकास योजनेचे खरे श्रेय पंकजाताईंनाच आहे, परळी शहराची आवस्था बकाल झाली आहे, विकासाच्या नावाखाली नुसता भ्रष्टाचार चालू असून येत्या नगर पालिकेच्या निवडणुकीत शहरात परिवर्तन घडविण्यासाठी भाजपला साथ द्या असे आवाहन खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांच्या हिताच्या विविध योजना आणल्या असून त्याचा लाभ घेण्याचे त्यांनी केले. प्रा.पवन मुंडे यांनी आपल्या प्रभागात विविध विकास योजना प्रभावीपणे राबविल्या असून शहरात विकासाचे काम त्यांनी उभे केले आहे, पुढील काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन खासदार डॉ.मुंडे यांनी केले.
प्रास्ताविक नगरसेवक प्रा.पवन मुंडे यांनी केले. प्रभागात राबविलेल्या विविध विकास योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. भाजपच्या जेष्ठ नेत्या पंकजाताई मुंडे, खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्यामुळे प्रभागात विविध विकास योजना आपण राबवू शकलो असेही ते म्हणाले. निळकंठ चाटे, डॉ.शालीनीताई कराड, राजेश देशमुख यांनी यावेळी विचार मांडले. सुत्रसंचालन चंद्रकांत देवकते यांनी तर आभार प्रदर्शन योगेश पांडकर यांनी केले. प्रभागातील 250 नागरिकांना यावेळी ई-श्रम कार्डचे वाटप यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
Thursday, January 27, 2022
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारा क्रांतिकारी पक्ष म्हणून शेकाप मध्ये प्रवेश.–विजय मगर.
माजलगाव (प्रतिनिधी) जिल्हा व सत्र न्यायालयाचे सेवानिवृत्त अधीक्षक श्री विजय मगर यांनी शेतकरी कामगार पक्षांमध्ये आज रोजी जाहीर प्रवेश केला त्यावेळी त्यांनी शेतकरी कामगार पक्ष हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रमाणिकपणे लढणारा क्रांतिकारी पक्ष असल्याने शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा घेऊन फुले, शाहू, क्रांतिसिंह,अण्णाभाऊ या महापुरुषांच्या विचाराने शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या चळवळीच्या लढाई लढण्यासाठी शेतकरी कामगार पक्षात केल्याचे सांगितले.
जिल्हा व सत्र न्यायालयाचे सेवानिवृत्त अधिक्षक विजय एकनाथराव मगर साहेब यांनी अर्जून रावसाहेब मस्के यांच्यासह भाई अॅड.नारायण गोलेपाटील यांच्या नेतृत्वात व भाई दत्ताप्रभाळे,भाई भिमराव कुटे यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला.त्यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शेतकरी कामगार पक्ष हा क्रांतिकारी पक्ष असूनस्वातंत्र्याच्या चळवळीत अग्रभागी असणारा पक्ष आहे स्वातंत्रोत्तर काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमकपणे लढा लढणारा पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्ष आहे, महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारधारेला प्रमाण मानुन शिव फुले शाहू क्रांतिसिंह अण्णाभाऊ या महापुरुषांच्या विचाराने शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा घेऊन लढणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यावेळी भाई विष्णुपंत शेळके व भगवान खेत्री सर आदींची उपस्थिती होती.
डॉ. अनिल अवचट यांच्या निधनानेकृतीशील विचारवंत हरपला. महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी.- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली.
मुंबई :- "ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक डॉ. अनिल अवचट कृतीशील विचारवंत होते. समाजातील संवेदनशील प्रश्नांवर त्यांनी स्पष्ट विचार मांडले. लोकहितासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. 'मुक्तांगण'च्या माध्यमातून हजारो बांधवांना व्यसनमुक्त केलं. व्यसनमुक्ती चळवळीतील त्यांचं कार्य, त्यांनी केलेले प्रयोग अन्य देशांसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक ठरले. वैद्यकीय तज्ज्ञ, पत्रकार, लेखक, चित्रकार, शिल्पकार, विचारवंत, सामजिक कार्यकर्ता असं बहुआयामी जीवन समरसून जगणाऱ्या हरहुन्नरी डॉ. अनिल अवचट यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी आहे. डॉ. अवचट यांच्या कुटुंबियांच्या, 'मुक्तांगण' परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे. मी डॉ. अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मी डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रध्दांजली वाहिली.
*******
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांना श्रद्धांजली.
*समाजासाठी भरीव योगदान देणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व.
मुंबई :- साहित्यातून, पत्रकारितेतून सामाजिक कार्याचा डोंगर उभा करता येतो, याचे आदर्श उदाहरण ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी घालून दिले. सेवाव्रत सामाजिक कार्यकर्ता, मनस्वी साहित्यिक आणि हाडाचा पत्रकार अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे आपल्यातून निघून जाणे क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
डॉ. अवचट यांनी मराठी पत्रकारिता आणि साहित्यिक प्रवासात आपल्या अनोख्या लेखनशैलीची महत्वपूर्ण अशी भर घातली. त्याचबरोबरीने त्यांनी सामाजिक कार्य आणि सामाजिक चळवळीतही हिरीरीने सहभाग घेतला. व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य या क्षेत्रात त्यांनी संस्थात्मक आणि भरीव असे योगदान दिले आहे. त्यांचे चौफेर लेखन आणि साहित्यकृती, सामाजिक कार्य हे पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असे आहे. त्यांचे हे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
0000
राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता मिळणार वाईन. राज्यमंत्रीमंडळात घेण्यात आला निर्णय.
मुंबई:-राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईनची विक्री करता येणार आहे.तशा प्रकारचा निर्णय आज झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. एक हजार स्केअर फुटाच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येऊ शकेल.आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सुपर मार्केट, वॉकिंग स्टोअरमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी देण्याबाबत प्रस्ताव आला होता. त्यावर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी यासंबंधीची माहिती दिली.
राज्यात नवी वाईन पॉलिसी राबवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे आणि त्यादृष्टीनं राज्य सरकारनं आणखी एक पाऊल पुढं टाकलंय. पुढच्या वर्षापर्यंत वाईन उद्योगाचा विस्तार 1 हजार कोटी लिटरपर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यादृष्टीनं आता राज्य सरकारनं पाऊलं टाकायला सुरुवात केली आहे.
सध्या राज्यात वाईनची दरवर्षी 70 लाख लिटरची विक्री होते. सरकारच्या या नव्या धोरणामुळं हा आकडा 1 हजार कोटी लिटरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्या आधी राज्य सरकारनं वाईनवर प्रति लिटर 10 रुपयांचा अबकारी कर जाहीर केलाय. त्यामुळे वाईन थोडी महाग होणार आहे. दुसरीकडे, अनेक बेकरी पदार्थांमध्ये वाईनचा उपयोग होत असतो. बहुतेक वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे वाईनचा वापर चवीसाठी केला जात असतो. त्यामुळे दैनंदिन किराणा दुकानात होणाऱ्या वाईनची विक्री ही बीअरच्या धर्तीवर कॅनमधून करण्याची मागणी होत आहे.
उत्पादन शुल्कानं या आधीच आयात व्हिस्कीवरील शुल्क 300 टक्क्यांवरून 150 टक्क्यांवर आणले आहे. आता सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
नगराध्यक्ष पदासाठीचे आरक्षण जाहीर पहा कोण होणार नगराध्यक्ष.
बीड ;- बीड जिल्ह्यातील नुसत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणूकीच्या नगरअध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत जाहीर झाली असुन त्याचे पुढीलप्रमाणे आरक्षण आहे.
आष्टी,पाटोदा,शिरूर कासार तिन्ही नगरपंचायतचे नगराध्यक्षपद
*सर्वसाधारण महिलासाठी आरक्षण जाहीर.
केज ---- SC अनुचित जाती.
वडवणी --- सर्वसाधारण
आरक्षण जाहीर
फेब्रुवारीत नगराध्यक्षपदाची निवड होणार आहे.
परळी तालुका पेशनर्स असोसिएशनच्या कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त नगरसेवक प्रा पवन मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : परळी येथील परळी तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्या स्वाती नगर येथील कार्यालयात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाजपाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात संघटनेच्या भविष्यातील कामासाठी आपले सदैव सहकार्य राहील व येणाऱ्या काळात मा. खा. डॉ प्रीतमताई मुंडे यांच्या माध्यमातून संघटनेच्या सुसज्ज कार्यालयासाठी आपण निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली.या प्रसंगी प्रमुख अतिथी पी एल बोरा यांच्या समवेत पेन्शनर्स असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष रंगनाथ मुंडे,सचिव सुग्रीव राख,उपाध्यक्ष सुधाकर आंबेकर,जेष्ठ सदस्य डी एल गायकवाड, रंगनाथ खके, हनुमंत रोडे,मधुकर ढाकणे,सोपान शिरामे, सुधाकर पाठक, अवस्थी सर,हजारे सर व पवार सर आदी मान्यवर उपस्थित होते.
परळी न.प.चे राष्ट्रवादी काॕग्रेसचे गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या वाढदिवसा निमित्त गोपाळ आंधळे यांच्याकडून तुळजाभवानीची प्रतिमा देवुन सत्कार.
परळी वैजनाथ (प्रतिनीधी) बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे साहेब यांचे खंदे शिलेदार न.प.गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त येडशी ते तुळजापुर पायी दिंडी काढत ही दिंडी परळीत आल्यानंतर शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी वाल्मीकअण्णांचा वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला दि.27 रोजी तुळजाभवानीची प्रतिमा भेट देत तुळजापुर येथील प्रसाद देवुन सत्कार केला यावेळी दिंडीतील सहकार्यासह कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.
न.प.गटनेते वाल्मीकअण्णा कराड कराड यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी येडशी ते तुळजापुर अशी पायी दिंडी काढत वाल्मीकअण्णांच्या उदंड आयुष्यासाठी तुळजाभवानीची पुजा व गोंधळ कार्यक्रम करत साकडे घातल्यानंतर तुळजाभवानीच्या दरबारातुन घेतलेली प्रतिमा तसेच प्रसाद वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला गुरुवार दि.27 रोजी जगमित्र कार्यालयात शाल,श्रीफळ,फेटा बांधून तुळजाभवानीची प्रतिमा व महाप्रसाद देत सत्कार करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी पायी दिंडीत सहभागी हनुमान आगरकर,अर्जुन साखरे,सोमनाथ आंधळे, टाक मामा ,विजय पोखरकर, नामदेव पाथरकर यांच्यासह पत्रकार संजय खाकरे,धनंजय आढाव,दत्तात्रय काळे,धीरज जंगले,महादेव गित्ते,बालासाहेब फड,अभिमान मस्के,रामेश्वर महाराज कोकाटे,महादेव शिंदे, रवी मुळे, माऊली मुंडे, आदी उपस्थित होते.
Wednesday, January 26, 2022
राज्यातले ६ जलविद्युत निर्मिती प्रकल्प जाणार खाजगी कंपन्यांच्या घशात :- कृष्णा भोयर
परळी :- सरकारला भाडेतत्वावर जे पैसे मिळतात त्यापेक्षा जास्त पैसे मिळावेत यासाठी हा निर्णय घेतला जात आहे. महानिर्मितीच्या ताब्यात असणारे सहा जलविद्युत प्रकल्प खाजगी कंपनीकडे देण्यात येणार असून या कंपन्यांकडून वीजनिर्मिती केली जाणार आहे. आत्तापर्यंत शासनाच्या अख्यातीत असणारी वीजेची निर्मिती खाजगी कंपनीकडे गेल्यामुळं सामान्य माणसाला कधी ना कधी याचा फटका बसण्याची शक्यता आहे. अजून हा निर्णय झाला नसला तरी पुढच्या काही महिन्यात यावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. महानिर्मितीकडून आत्ता सरकारला भाडेतत्वावर जे पैसे मिळतात त्यापेक्षा जास्त पैसे मिळावेत यासाठी हा निर्णय घेतला जात असल्याचं राज्य सरकारकडून जाहीर झालेल्या शासन निर्णयावरून समजतंय.
नोव्हेंबर मध्ये निघालेल्या शासन निर्णयानुसार महानिर्मितीकडे असणारे जलविद्युत प्रकल्प आता खाजगी कंपन्यांच्या हातात जाण्याची शक्यता आहे. यासाठी एक समिती नेमण्यात आली असून या समितीकडून येणाऱ्या अहवालावरून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सिंचन भवन, पुणे येथील अधिकाऱ्यांकडून मिळाली. यासाठी काही खाजगी कंपन्यांकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत. तसंच यासंदर्भात अजून काही कार्यवाही झालेली नसली तरी जे प्रकल्प महानिर्मितीकडून काढून घेतले जाणार आहेत त्या प्रकल्पांची माहिती खाजगी कंपन्यांकडून घेतली जात असल्याची बाबदेखील समोर आलेली आहे.
जलसंपदा विभागाच्या मालकीचे व करारानुसार महानिर्मितीच्या ताब्यात असणारे सहा जलविद्युत प्रकल्प ज्यांचं नियत ३५ वर्षाचं आयुर्मान पूर्ण झालेलं आहे, ज्यामध्ये येलदरी, वैतरणा, भाटघर, कोयना धरण पायथा, कोयना स्तर तीन आणि जायकवाडी धरणावरील पैठण या प्रकल्पांचा समावेश आहे, हे सर्व प्रकल्प महानिर्मितीच्या ताब्यातून काढून घेऊन खाजगी कंपन्यांच्या ताब्यात देण्याचा सरकारचा विचार असल्याचं नोव्हेंबर महिन्यातील जलसंपदा विभागाच्या शासन निर्णयातून समजतंय. येलदरी ३७.५ मेगावट, वैतरणा १६० मेगावट, भाटघर ११६ मेगावट, कोयना धरण पायथा २२० मेगावट, कोयना स्तर तीन ४८० मेगावट तर जायकवाडी ११२ मेगावट इतकी स्थापित क्षमता असणारे हे प्रकल्प अनुक्रमे जानेवारी १९६९, जून १९७७, फेब्रुवारी १९७८, नोव्हेंबर १९७७, सप्टेंबर १९८२ आणि ऑगस्ट १९८७ मध्ये जलसंपदा विभागाकडून महानिर्मितीकडे सोपवण्यात आले होते.
महानिर्मिती आणि जलसंपदा विभागातील करार नक्की काय होता?
राज्यामधल्या जलविद्युत प्रकल्पांची उभारणी जलसंपदा विभागामार्फत कार्यरत असलेल्या जलविद्युत संघटनेमार्फत करण्यात आली आहे. मात्र त्यानंतर हे प्रकल्प भाडेपट्टी तत्वावर चालवण्यासाठी आणि देखभालीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) कडे सोपवण्यात आले आहेत. त्यांच्यामध्ये ३५ वर्षाचा करार झाला होता ज्यानुसार महानिर्मितीकडून जलसंपदा विभागाला प्रकल्पांमधून वीजनिर्मितीबद्दल भाडेपट्टी दिली जाते. विद्युत अधिनियम २००३ मधील तरतुदीनुसार तत्कालीन महाराष्ट्र राज्य वीज महामंडळाचं म्हणजेच एमएसइबीचं विभाजन होऊन महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीन स्वतंत्र कंपन्या अस्तित्वात आल्या. याचवेळी विद्युत नियामक मंडळाची देखील स्थापना झाली.
जलविद्युत प्रकल्पातून होणाऱ्या वीजनिर्मितीपासून महसुली रक्कम राज्य शासनाला मिळावी यासाठी भाडेपट्टीची सुधारित रक्कम २००८ च्या आयोगाच्या आदेशानुसार आधीच्या महाजेनको आणि नंतरच्या महानिर्मितीकडून जलसंपदा विभागाला मिळत होती. मात्र आता हा करार संपल्यामुळे, आणि सुरुवातीच्या काळात वीर आणि भाटघर प्रकल्पांचा करार संपल्यामुळे याची भाडेपट्टी मिळणं बंद झालेलं आहे. वीर प्रकल्प २०१० सालीच जलसंपदा विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. सदर प्रकल्प नुतनीकरण आणि आधुनिकीकरण आणि त्यानंतर परिचलन करण्यासाठी यासाठी बिल्ड-ऑपरेट-ट्रान्स्फर म्हणजेच बीओटी तत्वावर खाजगी कंपनीकडे देण्यात आला आहे. त्याच धर्तीवर हे अजून सहा प्रकल्प बीओटी तत्वावर खाजगी कंपनीकडे सोपवण्याचा शासन विचार करत आहे.
"महानिर्मितीकडून प्रकल्प खाजगी कंपन्यांकडे जाणार असल्याची बाब खरी आहे मात्र या गोष्टीला कदाचित थोडा कालावधी लागू शकतो. महानिर्मितीकडे असणाऱ्या कालावधीमधील वीजनिर्मिती तपशील, दुरुस्तीचा तपशील अशा अनेक गोष्टींचं रेकोर्ड जलसंपदा विभागाला द्यावं लागणार असल्यामुळे या कार्यवाहीमध्ये किती वेळ जाऊ शकेल याचा अंदाज लावता येणार नाही," अशी माहिती महानिर्मितीमधील एका अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. तसच सिंचन भवनमधील अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु अजून समितीकडून कुठलाही अहवाल सादर झाला नसल्याचं समजलं. अधिक माहितीसाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशीदेखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्यास प्रोत्साहीत केल्याने शेख अफसाना यांना डाक मित्र पुरस्कार.देऊन सन्मान.
-
बीड (प्रतिनिधी) राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून बीड डाक विभागाचे सन्माननीय डाक अधीक्षक एस.एम. अली यांनी बीड जिल्ह्यातील जनतेला, लोक प्रतिनिधींना व सामाजिक कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्यासाठी मदतीचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत श्रीमती अफसाना शेख यांनी बीड हेड पोस्ट ऑफिस चे पोस्टमास्टर अमरसिंग ढाका यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मोहल्ल्यातील व बीड परिसरातील लहान मुलींचे खाते उघडण्यासाठी घरो घरी जाऊन प्रसार प्रचार करीत 125 सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडण्यासाठी मदत केली म्हणून बीड डाक विभागाने याची दखल घेत प्रजासत्ताक दिनी त्यांना डाक मित्र पुरस्कार व माय स्टॅम्प देऊन गौरविण्यात आले. या कार्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रसंगी उप अधीक्षक संजय अंबेकर, पोस्ट मास्तर अमरसिंग ढाका, व डाक निरीक्षक प्रेमकुमार महाजन व बीड जिल्ह्यातील सर्व डाक कर्मचारी हजर होते.
एसआयओ बीड च्या वतीने हज हाऊस UPSC अभ्यास केंद्र संदर्भात पालकमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन.
बीड ( प्रतिनिधि) :- हज हाऊसच्या वतीने UPSC निवासी प्रशिक्षण संस्थेत करण्यात आलेले अनावश्यक बदल रद्द कारावेत यासाठी आज २६ जानेवारी २०२२ रोजी एसआयओ बीड च्या वतीने धनंजय मुंडे (मंत्री सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य) यांना निवेदन देण्यात आले .या वर सविस्तर माहिती अशी आहे की 1)हज हाऊस निवासी प्रशिक्षण संस्थेत 200 विद्यार्थ्यांची क्षमता असुनही केवळ 100 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला आहे.राहीलेल्या 100 विद्यार्थ्यांकरिता केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांना तात्काळ प्रस्ताव सादर करुन मंजुरी द्यावी. 2)मेन्स परिक्षा लिहणारे ज्या 37 सीनीअर विद्यार्थ्यांना हज हाऊस सोडण्याचे आदेश दिले होते त्यातील जे विद्यार्थी मुलाखतीसाठी (Interview) पात्र ठरतील त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा. 3) मेरीट बेसीस पुर्व परिक्षार्थींना किमान 3 वर्षाचा कालावधी मिळावा .4) पुर्वी हज हाऊसच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी मेस सवलत -सबसिडी बंद करण्यात आली होती ती पुन्हा सुरू करण्यात यावी. तसे ही मुंबई हज हाऊस च्या इमारतीत हज काळातील एक महिनाच वर्दळ असते आणि वर्षाचे उर्वरित 11 महिने ही इमारत मोकळी असते. 2006 साली मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाच्या सामाजिक - आर्थिक - शैक्षणिक स्थितीची माहिती देणारा सचर समिती अहवाल प्रकाशित झाला . यात मुस्लिम समुदायातील उमेदवार IAS , IPS, IFS , IRS सारख्या केंद्रीय शासकीय सेवेत कमी असल्याचे निदर्शनास आले , म्हणून मुस्लिम समुदायातील उमेदवारांचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेतील टक्का वाढावा या उद्देशाने मुस्लिम अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हज हाऊस येथे 2009 साली यूपीएससी कोचिंग इन्स्टिट्यूट ची स्थापना करण्यात आली. आणि उर्वरित 11 महिन्यात या इमारतीच्या 18 मजल्यांपैकी 3 मजल्यांमध्ये निवासी प्रशिक्षण सुरू झाले.
या वेळी एसआयओ बीड शहराध्यक्ष सय्यद खीझर, मुजम्मिल हनगी, सैफ उर रहेमान , मोहम्मद अली , मोहम्मद उमर, अन्सारी जुननुरेन, लुखमान फरूखी (एमआयएम विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष) उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनी बीड डाक कर्मचारी, MPKBY महिला एजंट यांचा गुण गौरव सन्मान संपन्न.
बीड (प्रतिनिधी) प्रजासत्ताक दिनी हेड पोस्ट ऑफिस बीड येथे गुणवंत डाक कर्मचारी अधिकारी व MPKBY महिला एजंट यांचा सत्कार पारितोषिक देऊन डाक अधीक्षक, डाक विभाग बीड एस. एम. अली साहेब
यांच्या हस्ते करण्यात आला. पोस्टाच्या विविध योजनेचे उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी उद्दिष्टे पूर्ण करणाऱ्यांना हा सन्मान दिला गेला. या मध्ये डाक विमा, ग्रामीण डाक विमा, आधार कार्ड ला मोबाईल लिंक करने, IPPB चे जास्त खाते उघडणे, PPf , TD, RD चे खाते उघडणे, 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधुन जास्तीत जास्त सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडणे हे उद्दिष्ट पूर्ती करण्यासाठी जास्त मेहनत करून खाते उघडायला मदत केल्या बद्दल सामाजिक कार्यकर्ता अफसर शेख या महिलेला बेस्ट डाक मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तिचा my stamp तयार करून गौरव करण्यात आला. डाक अधीक्षक श्री एस एम अली साहेबांनी पुरस्कार देण्यामागचा उद्देश कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहित करने व सामाजिक प्रतिष्ठा बहाल करणे होय. पुरस्कार विजेता मध्ये बीड चे डाक उप अधीक्षक संजय अंबेकर, डाक निरीक्षक प्रेमकुमार महाजन, पोस्टमास्टर अमरसिंग ढाका, भागवत पाठक, सुरेश कोमटवार, पवन खरात,प्रशांत मेढे, बंडू सानप, नितीन हजारे, दत्तात्रय गाडेकर, किरण सावंत, सुबोध कांबळे, महादेव थापडे, प्रीतम हुळजुते, वर्षा लांडगे,
राजेंद्र म्हेत्रे, प्रदीप गोरे, कराड, Mpkby महिला एजंट काळे बाई, उषा वनवे, भोले बाई इत्यादी लोकांना पुरस्कार देण्यात आला. सूत्र संचलन बी एस मोरे, नितीन आमटे व राजश्री सिद्दिवाल यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयु विलास वाघमारे, विजय दहिफळे, विशाल अगवान, कृष्णा गुजर, हनुमान कांबळे, बी एल चव्हाण, शिवाजी पवार, सिरसाठ, युनूस शेख, अल्लिमोद्दिन शेख, यांनी परिश्रम घेतले.
Tuesday, January 25, 2022
स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्काराविना प्रेत तसेच पडून राहिल्याची धक्कादायक घटना.
◾मरणानंतरही यातना संपेना, गावात स्मशान भूमीच नसल्याने तब्बल १० तास पहावी लागली वाट : अखेर पडीक जमिनीवर करावे लागले अंत्यसंस्कार
गोंडपीपरी (प्रतिनिधी ) : चंद्रपुरातील एका गावात स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्काराविना तब्बल प्रेत तसेच पडून राहिल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली गावातील एका कुटुंबावर ही दुर्देवी वेळ आली. स्मशानभूमी नसल्याने कुटुंबातील सदस्याचे अंत्यसंस्कार अखेर पडीक जमिनीवर करण्यात आले. चंद्रपूर येथील गोजोली गावात स्मशानभूमीच नाही. गावातील नागरिक वनविभागाच्या एका अतिक्रमित जागेवर अंत्यविधी करत असत. मात्र ५ वर्षाआधी या जागेवर वनविभागाने वृक्षारोपण केले आणि अंत्यसंस्कार करण्याची जागाच हिरावली गेली. नंतरच्या काळात गावात मृत्यू झाला, तर ग्रामस्थ स्वतःच्या शेतजमिनीत अंत्यसंस्कार करु लागले. तीच या गावाची प्रथा झाली.
मात्र, काल या गावातील पांडुरंग उराडे (७०) यांचा मृत्यू झाला. त्यांची शेतजमीन १० किमी दूर आडवळणाच्या भागात आहे. आता अंत्यविधी करायचा कुठे, असा प्रश्न कुटुंबियांना पडला. कुटुंबातील सदस्यांनी ग्रामपंचायत गाठली. अंत्यसंस्कार कुठे करायचे असा सवाल विचारला; मात्र प्रशासन आणि सरपंचांकडे याचे उत्तर नव्हते. पांडुरंग उराडे यांचा पहाटे ५ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. आप्तेष्टांनी १० तास सरकारी कार्यालयाचे खेटे घातले. अनेक जागा शोधल्या. मात्र अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा काही मिळेना. अखेर शोधाशोध करून एक पडीक जागा शोधून कसाबसा अंत्यविधी उरकला गेला. गोजोली गावाची स्मशानभूमीची जागा अद्याप निश्चित झालेली नाही. ती भविष्यात होईल, एवढीच माहिती सरपंच देऊ शकले.
गावातील मूलभूत सुविधांमध्ये स्मशानभूमीचा समावेश असतो. गोजोली जुने गावठाण असूनही आजी-माजी लोकप्रतिनिधी ही लोकोपयोगी सुविधा उभारण्यास असफल ठरले. म्हणूनच पांडुरंग उराडे यांना जगण्याने छळले होतेच मरणाने तिष्ठत ठेवल्याचा दुर्धर प्रसंग आप्तेष्टांना बघावा लागला.
परळी मंडप असोसिएशनच्या वतीने कार्यक्रमासाठी पन्नास टक्के आसन क्षमतेच्या परवानगीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन.
बीड (प्रतिनिधी) सर्व प्रकारच्या सामाजिक समारंभा साठी मंडप डेकोरेटर, मंगल कार्यालय, लॉन, बॅक्वेट हॉल मध्ये कार्यक्रम करण्यासाठी जागेच्या ५०% आसन क्षमतेची परवानगी यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले
ऑल इंडीया टेन्ट डिलर्स वेलफेअर ऑर्गनायझेशन (रजि.) संपुर्ण भारतातील मंडप डेकोरेटर्स, केटरर्स, मंगल कार्यालय, लॉन, बॅक्वेट हॉल, टेन्ट हाउस व लाईट साउंड डेकोरेशन व इतर सेवा देण्या-या व्यवसायिकांची सर्वोच संस्था आहे. ( रजी.नं. 37063 दिनांक 03 मे 2000 द्वारा सोसायटी आधीनियम अंर्तगत सोसायटी रजिस्ट्रार, दिल्ली यांचे कडे नोंदणीकृत आहे.
मार्च 2020 पासुन, COVID19 कारोना महामारीच्या प्रार्दुभावा मुळे राज्यात मंडप, मंगल कार्यालय, लॉन, बॅक्वेट हॉल धारकांनवर 50 लोकांच्या उपस्थीतीत कार्यक्रम करण्याचे निर्बंध टाकण्यात आले व ते आज ही लागू आहे. गेल्या दोन वर्षा पासुन आम्ही शासनाच्या नियमाचे पालन करुन, शासनास सहकार्य
लग्न समारंभाशी निगडीत अनेक व्यवसाय सिझनल स्वरुपाचा आहे. हा व्यवहार हजारो लाखो लोकांना रोजगार देणारा आहे, कोरोना ची पहीली, दुसरी व तिस-या लाटे मुळे आमच्या व्यवसायावर आर्थिक संकाटाच्या विळख्यात सापडुन अनेक व्यवसायिक बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत, आपनास वेळो-वेळी निवेदेने दिले आहेत.
आम्हाला आमचा व्यवसाय पुर्ण क्षमतेने अथवा जागेच्या ५०% आसन क्षमतेची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती आपणसा करण्यात येत आहे.
तसेच आमच्या पुढील मागण्या असुन गांभीर्यने विचार करावा
मंडप डेकोरेटर, मंगल कार्यालय, लॉन, बॅक्वेट हॉल ईत्यादी संबंधीत व्यवसाय वर जि.एस. टी हा 18% च्या ऐवजी 5% करावा लाईट बिला मधील फिक्स चार्ज कमी करण्यात यावे. औदयगीक वसाहती मध्ये गोडाउन करीता जागा उपलब्ध करुन दयावे.
कर्मचारी यांचा पी.एफ. भुगतानमध्ये सहुलत व स्थिती सामान्य होई पर्यंत शासनाने याचे नुकतान करावे.टेन्ट, मंडपामध्ये होणा-या विवाह समारंभाच्या लागणारा जि.एस. टी वधु पित्याला परत मिळण्याचे तरतुद करावी, कारण हिंन्दु विवाह धर्मानुसार कन्यादान आहे.कर्जधारकांचे व्याज माफ करावे व प्रत्येक ई.एम.आई. स्थिती.
सामान्य हाई पर्यंत चालु करण्यात येवु नये.मंडप डेकोरेटर, मंगल कार्यालय, लॉन, बॅक्वेट हॉल ईत्यादी संबंधीत व्यवसाय हे कोरोना महामारी काळात आत्यआवश्यक सेवा मध्ये राहणे गरजेचे आहे या सर्व सेवा या महामारीत देशासाठी योगदान देत आहेत. टेन्ट, सत्कार समारोह संबंधीत सुक्ष्म व अतीसुक्ष्म व्यावसायीक यांच्या खात्यात मदत राशी जमा करावी या व्यवसायचा अडचणी लक्षात घेउन व वेगळया पॅकेजची घोषणा करावी.
राज्य सरकार यांचे काम करणारे टेन्ट, केटरींग व्यावसायीक यांच्या बिलाचे भुगतान लवकरात लवकर करावे. म्हणजे ते आपल्या अर्थिक अडचणी सोडवु शकतील.
मंडप डेकोरेटर, मंगल कार्यालय, लॉन, बॅनक्वेट हॉल ईत्यादी संबंधीत व्यवसाय ला लावणा जाणा-या सर्व करात सुट मिळावी उदा. मालमत्ता कर, कर्मीशीयल कर, वॉटर टॅक्स, कचरा निवारण टॅक्स आधी बघताना त्यांच्या मागणीचाआधीी बाब ध्यानात यावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले या वेळी संघटणेचे विकास शिंदे, राहुल सावंत, शिवकुमार नाडार स्वप्नील सावजी आदी उपस्थित होते.
एस.आय.ओ. साउथ महाराष्ट्र आणि महाराष्ट्र एक्टिविस्ट फोरम च्या शिष्टमंडळाने हज हाऊसच्या सिईओंची घेतली भेट.
मुंबई :- हज हाऊसच्या वतीने UPSC निवासी प्रशिक्षण संस्थेत करण्यात आलेले अनावश्यक बदल रद्द कारावेत या आशयाचे पत्र महारष्ट्र ॲक्टिविस्ट फोरम आणि एसआयओ ने दिले होते त्यानंतर हज हाऊसचे मुख्य कार्यकारी अधिकारी याकूब शेखा यांनी महाराष्ट्र एक्टिविस्ट फोरम आणि एसआयओच्या शिष्टमंडळास चर्चेसाठी आमंत्रित केले. त्याच अनुषंगाने काल सोमवार दि. 24 जाने. 2022 रोजी सकाळी 11 वा. एसआयओ आणि महाराष्ट्र एक्टिविस्ट फोरमचे राज्यभरातुन आलेल्या सामाजिक कार्यकर्ते हज हाऊस मुंबई येथे चर्चेसाठी आले होते.
हज हाऊसच्या सीईओं सोबत तब्बल दोन तास चर्चा झाली. एसआयओ आणि महाराष्ट्र एक्टिविस्ट फोरमच्या शिष्टमंडळाने खुप प्रभावीपणे मुद्दे उपस्थित केले, महाराष्ट्रातुन आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण अशी विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर सीईओं विचारना केली असता संबंधित विषयांवर तोडगा काढण्यासाठी झालेल्या चर्चेदरम्यान जवळपास सर्वच मुद्यांवर सीईओंनी सहमती दर्शवली.
चर्चेतील महत्वाचे निर्णय :-
हज हाऊस निवासी प्रशिक्षण संस्थेत 200 विद्यार्थ्यांची क्षमता असुनही केवळ 100 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला आहे.राहीलेल्या 100 विद्यार्थ्यांकरिता केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांना तात्काळ प्रस्ताव सादर करुन मंजुरी घेण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन दिले.
- मेन्स परिक्षा लिहणारे ज्या 37 सीनीअर विद्यार्थ्यांना हज हाऊस सोडण्याचे आदेश दिले होते त्यातील जे विद्यार्थी मुलाखतीसाठी (Interview) पात्र ठरतील त्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल असे आश्वासन दिले.
- मेरीट बेसीस पुर्व परिक्षार्थींना किमान 3 वर्षाचा कालावधी मिळावा हा प्रस्ताव ही महाराष्ट्र एक्टिविस्ट फोरमच्या वतीने देण्यात आला तो प्रस्ताव ही केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांच्याकडे पाठवणार.
- पुर्वी हज हाऊसच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी मेस सवलत - सबसिडी बंद करण्यात आली होती ती पुन्हा सुरू केली जाईल म्हणत ही मागणी तात्काळ मान्य केली.
चर्चेत मांडलेल्या सर्वच मुद्द्यावर श्री.याकूब शेख यांनी शिष्टमंडळाला तुमच्या मागण्या रास्त असल्याचे आश्वासन दिले. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे आणि देशाची उत्तम सेवा करावी अशी आमची इच्छा आहे. त्यांनी अश्वासन दिले कि तुमच्या मागण्या मंत्रालयात तात्काळ प्रस्ताव सादर करुन मंजुरी मिळवून घेऊ.
या झालेल्या सकारात्मक चर्चेत महाराष्ट्रभरातून आलेले महाराष्ट्र अॅक्टिविस्त फोरमचे प्रतिनिधी सरफराज अहमद सोलापूर, मौलाना मुबीन सिद्दीकी हिंगोली,अमजत शेख चंद्रपूर, डॉ अंजुम कादरी उदगीर,आसेफ कुरेशी ( एसआयओ साऊथ महाराष्ट्र पिआर आणि मिडिया सेकर्टरी),अबेद खान,जुनेद आतार लातूर,सुफीयान मनियार बीड,फयाज इनामदार श्रीरामपुर, फिरोज शेख अहमदनगर,अहमद सरवर उदगीर,शाहेद(इबादुर्र रहमान) शेख बसमत,सय्यद बासीत देगलुर,मजहर शेख बसमत,अजीम तांबोळी मिरा भाईंदर,राजरत्न शिंदे बीदर,हमीद शेख मुंबई, अदनान शेख यांच्या सह महाराष्ट्रातील अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
बीड जिल्ह्याच्या माफियाराजच्या विरोधात रस्त्यावरती उतरू. पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेना इशारा.

बीड : बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. माफियाराज सुरू झाला आहे, सामान्य लोकांचे हित धाब्यावर बसवून स्वतःचे खिसे भरण्याच काम सुरु आहे. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे. बीड जिल्ह्यातील केज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या
* त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरू -
सुरुवातीला आम्ही दोन वर्ष शांत बसलो होतो. राजकारण नको म्हणून कुणावर टीकाटिप्पणी केली नाही. मात्र आज बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या माफियाराज आणि सामान्य लोकांची लूट पाहावत नाही. म्हणून रस्त्यावर उतरून न्याय मागणार असल्याची भूमिका पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली आहे. आम्ही गप्प बसणार नाही, सामान्य लोकांच्या हितासाठी आलेल सरकार आहे, लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष झालं तर त्यांना आम्ही क्षमा करणार नाही. त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आवाज उठवूं. असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
सांय दैनिक प्रारंभ चे संपादक जालिंदर धांडे यांना निर्भिड संपादक पुरस्कार जाहीर.
थकीत विजबील बाकी न भरल्यामुळे पुरवठा खंडीत करणाऱ्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ व मारहाण गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल.
गेवराई (प्रतिनिधी) गेवराई वीज वापराची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वागदरा तांडा (ता खंडित करण्यासाठी गेलेल्या वायरमनला दोघांनी शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रमेश बळिराम जाधव, विकास सखाराम जाधव (दोघे रा. वागदरा तांडा. गेवराई) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. वायरमन सुनील कचरू काटकर यांनी याबाबत फिर्याद दिली. गेवराई तालुक्यातील वागदरा तांडा येथील वस्तीवरील अनेक लोकांकडे वीज देयकांची मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे.
सध्या महावितरणकडून थकबाकी वसूलीसाठी वीज तोडणी मोहीम सुरु आहे. या आदेशाने वायरमन सुनील कचरू काटकर विद्युत पुरवठा बंद करण्यासाठी वायरमन सुनील काटकर हे गेले होते.येथील विद्युत पुरवठा बंद करत असताना रमेश बळिराम जाधव, विकास सखाराम जाधव यांनी श्री. काटकर यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. सुनील काटकर यांच्या फिर्यादीवरून रमेश जाधव, विकास जाधव याच्यांवर अडथळा आणल्याप्रकरणी गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
केज नगरपंचायत सर्वाधिक अकरा महिलासदस्य कोणालाही स्पष्ट बहुमत नाही कोण होणार नगराध्यक्ष ?
केज (प्रतिनिधी) ;- बीड जिल्ह्यात लोकसभेला खासदार महिला आहे. राज्यसभा खासदारही महिलाच आहेत. तसेच केज विधानसभा मतदारसंघात देखील आमदार म्हणून महिलाच प्रतीनिधी आहेत. बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष महिला आहेत आणि केज पंचायत समितीच्या सभापती देखील महिलाच आहेत.
केज नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीच्या वेळी सर्वच राजकीय नेत्यांची दमछाक होणार आहे बहुमत कोणाकडेच नाही, तसेच या निवडणुकीत एकूण सतरा जागेसाठी निवडणूक झाली होती त्यामध्ये तब्बल आकरा महिला नगरसेवक म्हणून विजयी झाल्या आहेत. केवळ सहा पुरुष नगरसेवक आहेत. महिलांचाच आकडा मोठा असल्याने यावेळी पहिल्या आडीच वर्षासाठी तरी महिलाच नगराध्यक्ष होणार तसेच उपनगराध्यक्ष देखील महिलेमधुनच होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे
गेल्या सात वर्षांपासून केज नगरपंचायत खा .रजनीताई अशोक पाटील यांच्या ताब्यात असताना त्यांच्या गटातील नगराध्यक्ष व नगरसेवकांनी केज शहरातील विकास करण्यासाठी दिलेले योगदान लोकांच्या पसंतीस उतरले नाही यामुळे या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला शहरातील मतदारांनी तिसऱ्या क्रमांकावर पाठवले आहे. तीन जागा देऊन त्यांची नाराजी त्यांनी दाखवली आहे.
केज नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीत शहरातील मतदारांनी सतरा जागेपैकी आकरा जागेवर महिलांना नगरसेविका होण्याची संधी दिल्याने यामध्ये जनविकास आघाडी सात महिला तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे दोन महिला व राष्ट्रीय काँग्रेसकडे एक महिला तसेछ स्वा।, शे , संघटना एक महिला अशा एकूण आकरा जागेवर महीला आणि सहा जागांवर पुरुष निवडून आल्याने येणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीच्या वेळी आरक्षण कोणतेही असले तरी केजची नगराध्यक्षा म्हणून महिलेचीच निवड करावी लागणार असल्याचे चित्र दिसु लागले आहे .
केज नगर पंचायत निवडणुकीत शहरातील मतदारांनी कोणत्याही पक्षाच्या बाजूने पुर्ण बहुमत दिले नसल्याने व नगर पंचायत निवडणुकीत सतरा जागेपैकी अकरा जागांवर महिला व सहा जागांवर पुरुषांची निवड मतदारांनी केल्याने केजच्या नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत महिलाच पुढे आहेत.
राष्ट्रवादीचे बीड जिल्हा अध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या बाजुने शहरातील जनतेने विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसला पाच जागा दिल्या परंतु त्यांच्या कन्या हर्षदा सोनवणे यांचा पराभव झाल्याने त्यांनाही आत्मचिंतन करावे लागणार आहे . जनविकास आघाडीचे प्रमुख असलेले हारुणभाई इनामदार यांनी पहिल्या टप्यातील निवडणुकीत प्रभाग सहामधुन उमेदवारी दाखल करून जनतेचा कौल अजमावला. यामध्ये त्यांना मतदारांचा प्रतिसाद दिसला नाही. हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी नगरपंचायतच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत पत्नीला प्रभाग क्र . आठ मधून उमेदवारी दिली तसेच पप्पू कागदे यांच्या रिपाइं गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना सोबत घेऊन जोरदारपणे विजय मिळवला आहे. या निवडणुकीत सतरा पैकी सर्वाधिक म्हणजे आठ जागा मिळविण्यात त्यांना यश आले आहे. केवळ एका नगरसेवकाचीच त्यांच्याकडे आवश्यकता आहे.
शिवसेनेचे रत्नाकर शिंदे यांच्या कार्याला मतदारांनी स्विकारले नाही. शिवसेनेच्या उमेदवारांना आपले डिपॉझिट या निवडणुकीत संभाळून ठेवता आले नाही . केज नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी येणाऱ्या काळात शहराची सुधारणा व्हावी या हेतूने सर्वाधिक म्हणजे सतरा जागेपैकी अकरा जागेवर महिलांना नगरसेविका म्हणून निवडून दिले आहे . जनविकास आघाडीकडे आठ पैकी सात महीला आहेत त्यामध्ये आशाबाई कराड , शकुंतला अंधारे , सीताताई बन्सोड , इनामदार आलिया हारून , पदमीनबाई शिंदे , इनामदार रेश्मा जलाल , इनामदार तरमीमबेगम यांचा समावेश आहे तर पुरुष नगरसेवक म्हणून जकीयोद्दीन इनामदार यांची वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाच जागा आहेत त्यामध्ये दोन महीला सोजरबाई गाढवे व शेख तसलीम यांचा समावेश आहे. पुरुष नगरसेवक म्हणून अझर इनामदार , जाधव बालाजी , भाऊसाहेब गुंड यांची वर्णी लागली आहे. राष्ट्रीय काँग्रेस कडून शितलताई दांगट , अदित्य पाटील , सोमनाथ गुंड आणि स्वा , शे , संघटना यांच्या कडून पल्लवी राजणकर असे अकरा महिलांचे संख्याबळ असल्याने आणि या निवडणुकीत कोणत्याच गटाकडे बहुमत नसल्याने तसेच नगराध्यक्ष पदावरून कोणाचीच नाराजी नको म्हणून आरक्षण कोणालाही सुटले तरी नगराध्यक्ष पदावर महिलेचीच निवड होण्याची शक्यता आहे .
केज उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळेना. आरोग्य उपसंचालकाकडे तक्रार.
केज (प्रतिनिधी) :- केज उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन वेळेवर मिळत नसल्याने त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्रस्त ६१ आरोग्य कर्मचाऱ्यांनी आरोग्य उपसंचालकाकडे तक्रार केली आहे.
केज येथील उपजिल्हा रुग्णायलयातील ६१ आरोग्य कर्मचाऱ्यांनी दि. २१ जानेवारी रोजी आरोग्य उपसंचालक लातूर यांना एक सह्यांचे निवेदन दिले आहे त्या निवेदनात म्हटले आहे की, केज उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नाही. त्यांना कधीही प्रत्येक महिन्याच्या २० तारखे नंतर किंवा त्या नंतर येणाऱ्या पुढल्या महिण्यात वेतन मिळते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचीआर्थिक कुचंबना व मानसीक त्रास होत आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी बँकेतुन गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज किंवा वाहन कर्ज घेतले आहे; अशा कर्मचाऱ्यांचे बँकचे कर्ज हप्ते वेळेवर परतफेड केली जात नाही. त्यामुळे त्यांची बँकेतील पत कमी होत असुन त्यांच्यावर अतिरीक्त व्याज म्हणुन बँक त्यांच्या कडुन दंड वसुल करत आहे. पुन्हा त्यांना कुठलीही बँक कर्ज पुरवठा करण्यास तयार होत नाही. काही कर्मचाऱ्याचे पाल्य बाहेर गावी शिक्षणासाठी असल्यामुळे त्यांना आर्थीक मदत करण्यास विलंब होतो. त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. उपजिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी आपले काम व आपले योगदान मनोभावे करतात. अशा कर्मचाऱ्याची आर्थीक कुचंबना होत असेल तर त्यांच्यावर काम बंद करण्याची वेळ येईल. याला उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय अधिक्षक व कार्यालयीन कर्मचारी जवाबदार राहतील. असा इशारा दिला आहे.
निवेदनावर सय्यद नासेर, प्रितम गोदाम, पोपळघट, ठोंबरे, आयेशा शेख, कांदे, पतंगे, ठोंबरे, कावेरी, मोटेगावकर, राऊत, मुंडे, बाराते, लोखंडे, जाधव, टेकाळे, काठवते,ओव्हाळ, राठोड, गवळी, लोंढे, देशमुख, क्षिरसागर, कुलकर्णी, जाधव, कदम, इनामे, राऊत, उगले यांच्यासह ६१ कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Monday, January 24, 2022
दहावी बारावी च्या प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर..!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी, तर बारावीची आणि व्यवसाय अभ्यासक्रमाची प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. राज्य मंडळाकडून पूर्वीच लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल, बारावीची परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च आणि व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा ४ ते ३० मार्च या कालावधीत होणार आहे. त्यानंतर आता प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च, तर बारावीची आणि व्यवसाय अभ्यासक्रमाची प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र ठरवलेल्या मुदतीत देऊन विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाहीत याची काळजी घेण्यात यावी, अशा सूचना राज्य मंडळाकडून विभागीय मंडळांच्या सचिवांना देण्यात आल्या आहेत.
पाकिस्तानमधील वादळ गुजरातमार्गे महाराष्ट्रावर धडकले; सावध राहण्याचा इशारा.
* कोकणात पाऊस तर मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आज थंड वारे सुरु झाले आहेत. यामुळे उ. कोकण आणि म. महाराष्ट्रात दृष्यमानता कमी झाली आहे.
मुंबई:-गेल्या काही दिवसांपासून निसर्गाने थंडी, पावसाची बरसात सुरु केली आहे. गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रसह देशभरात कुठे दाट धुके, कुठे अवकाळी पाऊस तर कुठे कडाक्याची थंडी पडत आहे. आज तर पाकिस्तानातून सुटलेले वादळ महाराष्ट्रात धडकले आहे.
पाकिस्तानातून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. यामुळे कोकणात पाऊस तर मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आज थंड वारे सुरु झाले आहेत. यामुळे उ. कोकण आणि म. महाराष्ट्रात दृष्यमानता कमी झाली आहे.
मुंबई - पुण्यात धुलीकणांचे प्रमाण वाढल्याची नोंद सफरने केली आहे. यामुळे वाहन चालविताना चालकांनी तसेच श्वसनाचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे. हे धुळीचे वादळ असल्याने पाकिस्तानातून आलेले धुलीकण हवेत पसरले आहेत. यामुळे समोरचे दिसणे कमी झाले आहे. शिवाय अधूनमधून ढगही ये-जा करत आहेत. यामुळे सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणावर जमिनीवर पडत नाहीय. यामुळे दृष्यमानता कमी झाली आहे
जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर.
बीड ;- आज दिनांक 24 जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले निवेदनात सन 2020 या वर्षातील पीक विम्याचे तात्काळ वाटप करण्यात यावे, चौसाळा विद्युत उपकेंद्राचे इंजिनीयर गेहलोत व तत्कालीन विद्युत वितरण कंपनीचे बीड तालुका उप अभियंता सानप यांच्या चौकशीचे लेखी आदेश देऊनही महावितरणचे अधीक्षक अभियंता त्यांना पाठीशी घालत आहेत याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी तसेच रौळसगाव ते अंजनवती या रस्त्याचे नुकतेच डांबरीकरण झाले असून ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे काम होऊन अवघे पंधरा दिवस लोटले आहेत मात्र रस्त्यावर वाहने चालवताना रस्ता चढ-उताराचा झाल्याचे तात्काळ लक्षात येते सदरील काम आमदार संदीप क्षीरसागर यांचे समर्थक व गुत्तेदार बाबुराव जोगदंड यांनी केले आहे त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकारी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत याबाबत कुणाचाही मुलाहिजा राखण्यात येणार नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संतोषजी राऊत यांनी सांगितले अशा या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा वाढदिवस दोन दिवसापूर्वी पार पडला याचे औचित्य साधत या शिष्टमंडळात मार्फत सत्कार करण्यात येऊ यांना उदंड व निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी माजी शिवसेना जिल्हाप्रमुख बीड चंद्रकांत ( अप्पा ) नवले, भाजपा किसान मोर्चा बीड तालुकाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, फुलचंद येडे, राजे भोसले, नितीन पाटील,जाधव आदींची उपस्थिती होती.
प्रजासत्ताक दिनी बीड जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण. भीमवाडी बौद्ध विहार कधी पूर्ण होणार सात वर्षे झाले - सचिन रोडे
*कार्यरभ कालावधी एक वर्षाचा,झाले सात वर्ष?*
*परळी नगर परिषद झोपली,गुत्तेदार बिल उचलून फरार?*
*विहार एक उपोषण मात्र तीन वेळा,मध्यस्थी समाजकंटक तोंडघशी पडले?*
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी शहरातील मध्यस्थी असलेली भीमवाडी या ठिकाणी 2014 ला नवीन बौद्ध विहार उभारण्याचा कार्यरभ आदेश परळी नगर पालिका याच्या वतीने देण्यात आला त्या आदेशानुसार एक वर्षात विहार पूर्ण करण्याचे आदेश असताना सात वर्षे उलटून गेली मात्र बौद्ध विहार अजून सुद्धा अपूर्णच आहे असे का?गुत्तेदाराला परळी नगर परिषद पाठीशी का घालत आहे या सात वर्षात तीन वेळा उपोषण करण्याची का वेळ आली आहे असा प्रश्न भीमवाडीतील नागरिकांना पडला असून या प्रजासत्ताक दिनी परत या विहाराला पूर्ण करण्याच्या मागणी करीता आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे भीमवाडीतील उपोषणकर्ते सचिन रोडे यांनी माहिती दिली आहे व परळी नगर परिषदचा अतिशय तीव्र शब्दात निषेध केला आहे शहारतील अनेक नवीन सभागृह एक वर्षात पूर्ण होऊन सामजिक कार्यक्रम होतात मग बौद्ध विहाराला जाणून बुजून उशीर करण्यात येत आहे का गुतेदाराला का पाठीशी घालत आहेत या एका विहारासाठी आतापर्यत तीन वेळा उपोषण करण्याची वेळ भीमवाडीतील महिला नागरिकांना अली आहे प्रत्येक वेळा नगर परिषद काम लवकर पूर्ण करू म्हणून पत्र देऊन दिशाभूल करत असल्याचे सचिन रोडे यांनी म्हंटले आहे अनेक वेळा मध्यस्थी म्हणून काही समाजकंटक यांनी जीमेदरी घेऊन उपोषण मागे घ्या आम्ही गुतेदाराला बोलून काम पूर्ण करून घेऊ अशी पोकळ आश्वासन देण्यात आली मात्र वर्षे उलटून गेली तरी सुद्धा कामाला मात्र सुरवात करण्यात आली नाही आता मात्र 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी बीड जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण करण्याचे निवेदन नगर परिषद मध्ये दिले असता दिशा भूल करण्यासाठी कामाला सुरवात हळुवार सुरूवात करण्यात आली आहे आणि उपोषणाला बसू नाही असा दबाव टाकण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप उपोषण कर्ते सचिन रोडे यांनी म्हंटले आहे मात्र आता यावेळी काम पूर्ण होई पर्यत नगर परिषद बौद्ध विहार सम्बधित अधीकारी याना निलंबित करण्यात येत नाही ज्या एजेसन्सिला काम दिले आहे त्या एजेन्सीवर कारवाई होत नाही तो पर्यत सहकार्य सोबत आमरण उपोषण उठणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे
भ्रष्टाचार विरोधी पुरस्कार सोहळ्यास मोठया संख्येने उपस्थित रहावे--विवेक कुचेकर
" *एसीबीच्या 23फिर्यादीना पुरस्कार जाहीर"
बीड (प्रतिनिधी) जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हयात मागील 24 वर्षापासून भ्रष्टाचार विरोधी जन जागृती अभियान कार्यक्रम चालु असुन त्याचाच एक भाग म्हणून भ्रष्टाचार विरोधी सहकार्य करणारया फिर्यादीचा सत्कार ठेवण्यात येतो
मागिल वर्षात बीड जिल्हा प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी, कर्मचारयाचां निषेध , एसीबी ऑफिसकडे थेट लढ्ढा करून त्याना धडा शिकवणारे बीड जिल्हयातील 23 शुर फिर्यादी असुन त्याना भ्रष्टाचार जनजागृती अभियान बीड जिल्हा मार्फत भ्रष्टाचार विरोधी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून किसन बाबुराव सावंत(जेष्ठ मार्गदर्शक भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन ,बीड), कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड,अजित एम,देशमुख, (राज्य समिती सदस्य भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन महाराष्ट्र) प्रमुख उपस्थिती राजकुमार घायाळ(कामगार नेते),
भारत राऊत (पोलीस उपाध्यक्ष एसीबी बीड ), कार्यक्रमाचे मुख्य आयोजक तथा भ्रष्टाचार विरोधी जन जागृती अभियान संस्थापक अध्यक्ष नवनाथजी नाईकवाडे इत्यादी राहणार असुन हा पुरस्कार वितरण सोहळा दि 26 जानेवारी रोजी दुपारी 01 वाजता सर्वेश्वर गणपती मंदीर,जालना रोड बीड याठिकाणी होणार असुन तरी सर्व भ्रष्टाचार विरोधी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भ्रष्टाचार विरोधी जन जागृती अभियान बीड तालुका सदस्य विवेक कुचेकर यानी केले आहे.
काळजी वाढली!आता येणार थंडीची लाट.हवामान विभागाचा सावधानतेचा इशारा.
मुंबई (प्रतिनिधी ) राज्यात सध्या थंडीचा कडाका जास्त आहे. तापमान कमी जास्त होत असलं तरी थंडी मात्र कायम आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये पारा आणखी खाली घसरणार असून थंडीची लाट येणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.देशातल्या तापमानात मोठी घट होणार असल्याचंही हवामान विभागाचं म्हणणं आहे. त्या दृष्टीने नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
