Monday, January 31, 2022

प्रा,शिवराज बागंर यांच्यावरतीच एमपिडीची कारवाई का?--प्रमेश्वर माळी



"गोपाळ समाज करणार समाजकल्याण मंञ्याच्या घरासमोर जागरण गोधंळ "

बीड (प्रतिनिधी) उसतोड कामगारांचे नेते समाजसेवक  प्राध्यापक शिवराज बांगर  यांच्यावरती एमपिडी सारखी कारवाई करून त्यांना खोट्या गुन्हयात  गोवण्यात आले आहे   त्यांना पुढे राजकारणात समोर न येऊ देण्यासाठी  त्यांच्यावरती खोटे आरोप केलेले आहेत असा आरोप  गोपाळ समाजहीत महासंघ बीड जिल्हा संपर्क प्रमुख प्रमेश्वर माळी यानी केला आहे 
 भारत देशामध्ये  स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नंतर ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरती आवाज उठवणारा एक साधा सरळ आणि अत्यंत मनमिळावू अन्यायाला वाचा फोडणारा कार्यकर्ता म्हणजे प्राध्यापक शिवराज बांगर साहेब असुन  ऊसतोड कामगारांसाठीच नाही तर इतर गोरगरीब जनतेसाठी तत्पर असणारा एक कर्तुत्ववान असा  नेता आहे 
अठरा पगड जातींना एकत्र घेऊन सर्व जाती धर्माला सोबत घेवुन विश्वभुषण छत्रपती शिवाजी महाराज , विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,  महात्मा ज्योतिबा फुले , छञपती शाहू राजे, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे  थोर विचार मनात ठेवून चालणारा गोरगरिबांचा हा एक प्रेमळ आणि दबंग नेता आहे  सामाजिक चळवळीत काम करत असलेल्या प्रा,शिवराज बागंर यांच्यावरती राजकिय  सुडबुध्दीने कारवाई करण्यात आली असुन ही कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी अन्यथा समाजकल्याण मंञ्याच्या घरासमोर जागरण गोधंळ घालण्याचा ईशारा  गोपाळ समाजहित महासंघ  बीड जिल्हा संपर्कप्रमुख  परमेश्वर माळी यांनी केली आहे

No comments:

Post a Comment