*एक महिन्यात भुयारी गटार योजनेतील प्रलंबित कामे पुर्ण करणार.!मुख्याधिकारी अरविंद मुंडे.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : परळी शहरातील "110 कोटींच्या भुयारी गटारी योजनेतील" रखडलेल्या व भ्रष्ट कारभाराच्या विरोधात मा पंकजाताई मुंडे व डॉ खा प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांचे आमरण काल 30 ऑगस्ट रोजी 11 वाजता भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुरू होते,प्रसंगी खा डॉ प्रितमताई मुंडे यांनी अचानक उपोषण स्थळी भेट देऊन नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांना रखडलेल्या कामा बाबत जाब विचारून योग्य सूचना दिल्या,या प्रसंगी मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी एक महिन्याच्या आत "भुयारी गटार योजनेतील" रखडलेली कामे पुर्ण करण्याचे आश्वासन दिल्या मुळे तूर्तास उपोषण मागे घेण्यात आले.
या प्रसंगी खा डॉ प्रितमताई मुंडे यांनी नगरपरिषदे च्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर घेतले, न प चा असाच ढिसाळ कारभार राहिला तर तुम्हाला जनता माफ करणार नाही,नगरपालिकेच्या अशा बोगस, भ्रष्ट व ढिसाळ कामांमुळे पुढच्या वेळी मला उपोषनास बसण्याची वेळ आणू नका अशा कडक शब्दात खा प्रितमताई मुंडे यांनी अधिकाऱ्यांना झापले व नगरपालिकेच्या भोंगळ कारभारावर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी बारकाईने लक्ष द्यावे अशा सूचना ही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या, उपोषण करतांना प्रा पवन मुंडे यांनी भुयारी गटार योजनेतील कामा बरोबरच पंतप्रधान आवास योजनेतील प्रलंबित अनुदान त्वरित वाटप करणे,वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे,मेरुगिरी रस्ता त्वरित करणे व शहरातील अस्वच्छतेमुळे करावयाच्या उपाययोजना या बाबतीत निवेदन दिले होते, त्याला पालिकेने लेखी पत्राद्वारे पूर्ण कामे एक महिन्यात मार्गी लावण्याचे आश्वासन दिले,या प्रसंगी उपोषण स्थळी नगरसेवक प्रा पवन मुंडे यांच्या समवेत भाजपाच्या नगरसेविका उमाताई समशेट्टे, भारतीताई कुलकर्णी,भाजपाचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी,भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी,जेष्ठ नेते फुलचंद कराड,भाजपा तालुकाध्यक्ष सतीश मुंडे,शहर अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया,युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांच्या सहित शहर व ग्रामीण भाजपाचे जेष्ठ व युवा कार्यकर्ते मोठया संख्येने उपोषण स्थळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment