Saturday, August 28, 2021

दोन बहिणींचा नदीत बुडून मृत्यू ; राक्षसभुवन शनीचे येथील दुर्दैवी घटना.


गेवराई  (प्रतिनीधी)  आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्या बहिणींचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील शनीचे राक्षसभुवन येथे शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली . या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .

नेहा धर्मराज कोरडे ( वय ९ वर्ष ) व अमृता धर्मराज कोरडे ( वय ८ वर्ष ) असे मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत . घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिस ठाण्यात नवनिर्वाचित सहायक पोलिस निरीक्षक भास्कर नवले यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन मुलींचे मृतदेह पाण्याबरोबर काढले . तसेच घटनेचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले .

गेवराई तालुक्यात यापुर्वी देखील मिरगाव , संगमजळगाव येथे धुणे धुण्यासाठी गेलेल्या मुलींचे गोदावरी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झालेले आहे . त्यातच शनिवारी राक्षसभुवन याठिकाणी घडलेल्या या घटनेने मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment