Sunday, May 30, 2021

राजकीय पक्ष संघटनांच्या आंदोलनाला क्रांती मोर्चाचा पांठीबा नाही...

* तुम्हाला सहा जणांना निर्णय घेण्याचा अधिकार कोणी दिला.?
समन्वयकाच्या बैठकीत निर्णय. 

बीड ( प्रतिनिधी) मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर काही राजकीय पक्ष संघटना आंदोलन करीत आहेत. त्याला स्वायत्त अराजकीय मराठा क्रांती मोर्चाचा पांठीबा असणार नाही असा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या मुख्य समन्वयकांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
      दिंनाक 25 मे रोजी झालेल्या क्रांती मोर्चाच्या समाज बैठकीत दोन दिवसात एक व्यापक बैठक घेऊन आरक्षणाच्या आंदोलनाची दिशा ठरवायची असा निर्णय झाला होता. व तशा बातम्याही सहा समन्वयकांनी  वर्तमानपत्रात दिल्या होत्या. पण रात्रीतून काय जादु झाली माहीत नाही आणि कुठल्याही समाज बांधवांना विचारात न घेता मराठा क्रांती मोर्चा आपली घरची जहागिरी समजुन जे लोकशाही पद्धतीने आंदोलन करतील त्यांना पाठिंबा राहील असा निर्णय त्या वादग्रस्त सहा समन्वयकांनी जाहीर केला.आजपर्यंत क्रांती मोर्चाचे जे काम झाले त्यात समन्यवका  बरोबर हजारो समाज बांधवांचे योगदान आहे हे विसरून चालणार नाही.पण या सहा समन्वयकांना इतर पक्षाच्या,संघटनेच्या मोर्चाला पाठिंबा देण्याचा अधिकार कोणी दिला.? असा सवालही बैठकींमध्ये करण्यात आला.
      वास्तविक पहाता मराठा क्रांती मोर्चा हा समाजाच्या न्याय हक्कासाठी एक अराजकीय व्यासपीठ तयार करण्यात आले होते जेणेकरून विवीध पक्ष संघटनेत काम करणारे लोक पक्षविरहीत एकत्र येतील म्हणुनच या सहा अराजकीय लोकांची समन्वयक म्हणुन निवड केली होती.काही काळ या सहा समन्वयकांनी क्रांती मोर्चाचे काम बंद केले होते नंतर आशीर्वाद मंगलकार्यालयात बैठकींमध्ये २१ समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली होती. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर क्रांती मोर्चानेच आंदोलनाचे नियोजन करणे आवश्यक आहे. पंरतु हे सोडुन स्वताच्या स्वार्थासाठी काही सहा समन्वयक राजकिय पक्ष संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची भूमिका घेत आहेत. ती मुळ क्रांती मोर्चाच्या धोरणाला हरताळ फासणारी आहे.कोणालाही विचारात न घेता समन्वयका बरोबरच समाजाचा विश्चासघात करण्याचे पाप कोणी करत असेल तर मराठा समाज माफ करणार नाही.आमचा कोणालाही विरोध नाही पण क्रांती मोर्चाचे नाव घेऊन कोणालाही पाठिंबा देता येणार नाही.असेही बैठकींमध्ये चर्चा झाली.
     जेंव्हा यापुढे कोरोनाचे वातावरण कमी झाल्यानंतर जी आंदोलने होतील ती मराठा  क्रांती मोर्चाच्या नावानेच होतील कुठल्याही राजकीय पक्ष संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा रहाणार नाही असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
       या बैठकीला बीडजिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक श्री. रमेश चव्हाण, किशोर पिंगळे,प्रा सचिन उबाळे,विजय लव्हाळे,अॅड.महेश धांडे,संदीप उबाळे,संतोष जाधव,सुनिल सुरवसे,अॅड.विशाल कदम,अॅड.शशिकांत सावंत,भाऊसाहेब डावकर,जयमल्हार बागल,युवराज मस्के,शैलेश जाधव,
रवी शिंदे,गणेश मस्के,भागवत मस्के,
 उपस्थित होते.

No comments:

Post a Comment