Saturday, May 29, 2021

बीड जिल्हात कायदा-सुव्यवस्थेची वाट लागली ‘राजा’ रामा स्वामी च्या पोलीसांनी सुव्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगली.

 

बीड — जिल्ह्यात राजा रामा स्वामींच्या कारकिर्दीत कायदा-सुव्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगली गेली आहेत. रोज पोलिसांची नवी प्रकरण समोर येत आहेत. अवैध धंद्यांना अभय दिलेल्या राजाच्या पोलिसांनी आता भडवेगिरी देखील सुरू केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार देणाऱ्या वडिलांना मुलीचा शोध घेण्यासाठी दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या सपोनि गव्हाणकर याने चाळीस हजार रुपयाची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस अधीक्षकांना यासंदर्भात तक्रार केली असून नेहमीप्रमाणे पोलीस अधीक्षक पुळचट भूमिका घेतील काय? असा प्रश्न जनतेतून विचारला जाऊ लागला आहे.

बीड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी पदभार घेतल्यानंतर कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. पोलीस यंत्रणा माफियांचे पाय चाटण्यात गूंतलेली असल्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन धोक्यात आले आहे. पोलीस ठाण्याचे तक्रार राजा रामा स्वामी यांच्याकडे केली तरी ते संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर कुठलीच कारवाई करत नाहीत. त्यामुळे प्रत्येक पोलिस ठाण्याचा कारभार पाहिजे तसा हाकला जात आहे. एकूणच “वर मायच शिंदळ तर वऱ्हाडाचा काय”? असं चित्र पाहावयास मिळत आहे. राजा रामा स्वामींची पोलीस पैशासाठी आता भडवेगिरी देखील करू लागल्या च उघडकीस आला आहे.
माजलगाव तालुक्यातील बेलोरा येथील भगवान आसाराम फपाळ यांच्या 17 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार 25 मे रोजी दिंद्रुड पोलीस ठाण्यात दिली होती. परंतु या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिंद्रुड पोलीस ठाण्याचा सपोनि अनिल गव्हाणकर याने मध्यस्था करवी पीडित मुलीच्या वडीलाकडे 40,000 रूपयांची मागणी केली. अपहृत मुलीच्या वडिलांनी कसे बसे पंधरा हजार रुपये हनुमान अर्जुन फपाळ या पोलिसांच्या मध्यस्थाला दिले. चार पाच दिवसाचा कालावधी गेल्यानंतर मुलीच्या वडिलांनी ठाण्यात चौकशी केली. परंतु समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे पोलिसाच्या मध्यस्थ असलेल्या हनुमान फपाळला यासंदर्भात विचारणा केली. त्याने उर्वरित 25 हजार रुपये दिल्याशिवाय तपास लागणार नाही असे स्पष्ट सांगितले. अगोदरच मुलगी बेपत्ता त्यात पोलिसांना पैसे द्यायचे कुठून
या विचाराने त्रस्त झालेल्या पीडितेच्या वडिलांची अखेर पोलीस अधीक्षकांकडे रीतसर लेखी तक्रार केली. या तक्रारीत पोलिसांचा मध्यस्थी हनुमान फपाळ याच्याशी फोनवर झालेल्या चर्चेची ऑडिओ क्लिप देखील आपल्याकडे असल्याचं तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी मुलीचा शोध घेऊन पोलीस एजंट हनुमान व गव्हाणकर याच दोघांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment