Thursday, May 13, 2021

राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समितीच्या वतीने म.बसवेश्वर जयंती दिनी कोरोना ग्रस्तांसाठी भोजन व्यवस्था.


*नाथ प्रतिष्ठान, गोपीनाथराव मुंडे व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या माध्यमातून नियोजनात सहभाग-चेतन सौंदळे.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) जगातील पहिली लोकशाही संसद (अनुभव मंटप) ची स्थापना करून मानवता हाच धर्म याची शिकवण देणा-या समाजप्रबोधक जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने रूग्णालयातील कोरोनाग्रस्तांसाठीची भोजन व्यवस्था राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समिती परळी-वैजनाथच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य  श्रावणमास तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक चेतन सौंदळे यांनी दिली.

म.बसवेश्वर यांची जयंती वैशाखातील अक्षय तृतीयेच्या औचित्यावर जगभर साजरी केली जाते. सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा बीड जिल्हयाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्यावतीने नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून अन्नपूर्णा चॅरीटेबल ट्रस्ट द्वारा तसेच माजी ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान व नगरसेवक चंदूलालजी बियाणी यांच्या राधा-मोहन साथी प्रतिष्ठान व ईतर सामाजिक संस्थांच्या योगदानातून परळी शहर व परीसरातील कोविड सेंटर मधील करोना बाधित रूग्ण,कुटुंबातील व्यक्ती मयत झाल्यास ज्याच्या घरी चुल पेटवली जात नाही अशा कुटुंबियासाठी व करोना पॉझिटीव्ह रूग्णांच्या घरी प्रतिष्ठानकडे संपर्क केल्यास घरपोच दोन वेळेचे जेवण,नास्त्याचे डब्बे दररोज दिले जात आहेत.

महात्मा बसवेश्वर जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य तपोनुष्ठान समिती परळीच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत नाथ प्रतिष्ठान,गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून कोरोनाग्रस्तांसाठीच्या भोजन व्यवस्था करण्याच्या नियोजनात सहभाग घेतला आहे.लिंगायत समाज बांधवांनी घरीच म.बसवेश्वर जयंती साजरी करून नागरिकांनी लस टोचून घेऊन मास्कचा वापर करावा तसेच गर्दी टाळण्याचे आवाहन नगरसेवक चेतन सौंदळे यांनी केले आहे.

म.बसवेश्वर जयंतीदिनी कोरोनाग्रस्तांच्या भोजन नियोजनाकरिता राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य  श्रावणमास तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष नगरसेवक चेतन सौंदळे,कार्यअध्यक्ष शाहूराव ढोबळे,उपाध्यक्ष चंद्रकांत उदगीरकर,रमेशअप्पा सपाटे,वैजनाथ बागवाले,महेश निर्मळे,गिरीष बेंबळगे,सचिव संतोष पंचाक्षरी,सोमनाथ निलंगे,मकरंद नरवणे,नंदकुमार खानापुरे,सदानंद चौधरी,दत्ताअप्पा चिल्लरगे,जगदीश मिटकर,दयानंद चौधरी,अशोक नावंदे,अरविंद चौधरी,सचिन काटकर,संजय खाकरे,ओमप्रकाश बुरांडे,सोमनाथ गोपनपाळे,चंदूअप्पा हालगे,बबन शेटे,रवी मिसाळ,प्रा.अमर आलदे,दिलीप झुंजे,अ‍ॅड.गिरीष नरवणे,राजाभाऊ हलकंचे,शिरीष सलगरे,मन्मथ नरवणे,अनिल चौधरी,नरेश साखरे,रमेश काळे,बाबासाहेब शिगे,नागेश अलबिदे,शिवशंकर नाईक,शरद घनचेकर,संतोष चौधरी,योगीराज बर्दापुरे,प्रकाश खोत,गजानन हालगे,मनोज बेबळगे,जयप्रकाश स्वामी,रत्नेश बेलुरे,निरंजन गौरशेटे,कैलास रिकीबे,पिंटू चौधरी,अमोल घेवारे,संदीप चौधरी,बालाजी चीडबुके,हनुमंतअप्पा घेवारे,दीपक कापसे,अतुल खके,चंद्रकांत अंदुरे,अनिल मिसाळ,श्रीकांत खोत यांच्यासह सर्व समाज बांधव,पदाधिकारी व सदस्यांनी योगदान दिले आहे.

No comments:

Post a Comment