Tuesday, April 6, 2021

कांतीकारी साथी न्युज आजचे राशी भविष्य. ६ एप्रिल २०२१ : काय म्हणतोय एप्रिल महिन्यातील पहिला मंगळवार.


  • मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
  • कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: शुभ कार्यात बाधा येणार नाहीत
  • कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी शुभ आहे.

राशी भविष्य ६ एप्रिल २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विवाहासाठी उत्तम योग लवकरच निर्माण होईल. नोकरीत पदोन्नती होईल. मनात अस्वस्थता जाणवेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. शुभ रंग - तांबडा.
  2.  
  3. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: व्यावसायिक क्षेत्रात अनुकूल वातावरण राहील. गृहस्थजीवन आनंदमय राहील. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. वायफळ खर्च होण्याची शक्यता आहे. श्री गणेशाची पूजा करा. वैचारिक गोष्टींमुळे तुमच्या ज्ञानात भर होईल. शुभ रंग - राखडी. 
  4.  
  5. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: मनात शांतता ठेवा. आध्यात्मिक विचार आणि प्रवृत्तीमध्ये तुमचे मन लागेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल. आरोग्याची काळजी घ्या. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवणे थोडे कठीण जाईल. शुभ रंग - आकाशी.
  6.  
  7. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: दिवस व्यापाऱ्यांसाठी अनुकूल आहे. भाऊ-बहिणीचे नाते अतुट राहील. कोणत्याही कामात निश्चितच यश मिळेल. मनात स्थिरता ठेवा. सामाजिक क्षेत्रात अपयश येईल. वायफळ खर्च करू नका. शुभ रंग - पिवळा.
  8.  
  9. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: अनपेक्षित खर्च करणं टाळा. आपली आणि आपल्या कुटुंबाची विशेष काळजी घ्या. कुटुंबातील व्यक्तींमध्ये गैरसमज होणार नाहीत यावर लक्ष द्या. शुभ रंग - नारंगी.
  10.  
  11. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: शुभ कार्यात बाधा येणार नाहीत. प्रवास सुखाचा होईल. मित्र परिवारांकडून उत्तम साथ मिळेल. संध्याकाळ झाल्यानंतर मनात शंका सतावत राहील. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. व्यावसायिक क्षेत्रात प्रगती होईल. शुभ रंग - हिरवा.
  12.  
  13. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: दिवस शुभ आहे. आर्थिक लाभ होईल. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. तिर्थयात्रेला भेट देण्यासाठी चांगला दिवस आहे. प्रवास सुखाचा होईल. नकारात्मक विचार मनातून दूर करा. श्री गणेशाची आराधना करा. शुभ रंग - नारंगी.
  14.  
  15. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी चिंताजनक असेल. आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होणार नाही. घरातील गृहिणीच्या मनात असंतोष निर्माण होईल. मनात शांतता ठेवा. शुभ रंग - पांढरा.
  16.  
  17. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: प्रतिस्पर्धींशी स्पर्धा करणं टाळा. आरोग्य निरोगी राहील. नवीन कामाचा शुभारंभ करू शकता. मित्रपरिवारांच्या भेटीमुळे मनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. शुभ रंग - निळा.
  18.  
  19. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: मन अस्वस्थ राहील. काही प्रतिकूल गोष्टींचा सामना करावा लागेल. अनपेक्षित खर्च करणं टाळा. व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कोणताही महत्त्वाचा निर्णय विचारविनिमय करून घ्या. शुभ रंग - पांढरा.
  20.  
  21. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारांच्या भेटीमुळे आनंदाचे वातावरण राहील. मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवाल. संपूर्ण दिवस तुमचे मन सकारात्मक विचारांनी प्रसन्न राहील. शुभ रंग - हिरवा.
  22.  
  23. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. नोकरीत पदोन्नती होईल. रखडलेली कामं यशस्वीपणे मार्गी लागतील. शुभ रंग - निळा.

No comments:

Post a Comment