Tuesday, April 6, 2021

बीड जिल्हात कोरोनाचा प्रचंड कहर ! आज 716 पॉझिटिव्ह.

बीड (प्रतिनीधी ):- जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांचे लॉकडाऊन करूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली नाही. उलट रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागलीय. आज आलेल्या रिपोर्टमध्ये 716 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये बीड 131 आणि अंबाजोगाईत 161 रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांचे लॉकडाऊन घोषीत केले होते. मात्र त्यानंतरही कोरोनाची साखळी तुटली नाही. रुग्णांची संख्या वाढत असल्याने रात्री पुन्हा जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यात कडक निबर्ंंध लावले. आज कोरोना तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून 716 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामध्ये 1521 निगेटिव्ह तर एकूण 2 हजार 37 रुग्णांचे स्वॅब तपासण्यात आले होते. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई 161, आष्टी 98, बीड 131, धारूर 29, गेवराई 43, केज 64, माजलगाव 34, परळी 88, पाटोदा 31, शिरूर 31 आणि वडवणीमध्ये 6 रुग्ण आढळून आले आहेत.

No comments:

Post a Comment