पंढरपूर(प्रतिनीधी ) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. अवघ्या दोन वर्षांतच काळेंनी भाजपला रामराम ठोकला. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सहकार शिरोमणी वसंतराव कारखान्याचे अध्यक्ष असलेले कल्याणराव काळे यांचा पूर्ण गट राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा प्रचार करणार आहे.
कोण आहेत कल्याण काळे?
कल्याणराव काळे हे सोलापूर जिल्ह्यातील मोठं नाव
2019 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी ते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले
माढा, पंढरपूर आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात मोठा जनाधार
राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, बँकिंग, आरोग्य क्षेत्रातही मोठं काम
भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष
सीताराम महाराज साखर कारखान्याचे संस्थापक
श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष
सोलापूर जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष
सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्षपद भूषवले होते
राज्य सहकारी साखर संघाचे माजी उपाध्यक्ष

No comments:
Post a Comment