परळी वैजनाथ ( प्रतिनिधी)- : 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने परळी शहरातील सर्वात जुनी "पेन्शनर्स असोसिएशन" या संघटनेच्या स्वाती नगर येथील कार्यालयात येथील स्थानिक नगरसेवक प्रा पवन मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या ध्वजारोहण कार्यक्रमा प्रसंगी संघटनेच्या कार्यपद्धती, समस्या, अडचणी व उपाय योजना आदी विषयावर संघटनेचे श्री रंगनाथ खके सर व श्री बालासाहेब गित्ते आदींनी प्रकाश पाडला या वेळी आपल्या मनोगतात नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी संघटनेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी येणाऱ्या काळात नवीन सुस्सज इमारत,कार्यालयात पेन्शनर्स ला पूर्णवेळ वाचनालय तसेच नगरपालिकेच्या माध्यमातून अत्याधुनिक विद्युत व्यवस्था पुरवू असे सांगून संघटनेच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले.
या प्रसंगी व्यासपीठावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री हरिभाऊ चव्हाण,विद्यमान अध्यक्ष श्री रंगनाथ मुंडे,,उपाध्यक्ष सुधाकर आंबेकर आदी जण उपस्थित होते. या कार्यक्रमाला संघटनेचे सचिव सुग्रीव राख,सहसचिव भागीरथी बाई कोठावळे,संचालक अनंतराव मुंडे,रामकीसन गरड, सोपान सिरामे, रंगनाथ खके,शेख अजमोद्दीन म शरीफ,राखमाजी फड,मधुकर ढाकणे आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment