परळी वैजनाथ (प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याविरोधात परळीत महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आले. यावेळी माकप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, वंचित आघाडी सह आंदोलनाला पाठींबा असणाऱ्या विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. सकाळी 8 वा शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकातून निदर्शन करण्यात आले.
केंद्र सरकारने जाचक असलेला शेतकरी कायदा रद्द करावा यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने परळी बंदची हाक देण्यात आली आहे. जाचक कायदा रद्द करावा, केंद्र सरकार मुर्दाबाद अशा घोषणांनी परळी शहर दुमदुमून गेले. यावेळी माकपचे पी.एस.घाडगे, पांडुरंग राठोड,पी.एस.नागरगोजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाजीराव धर्माधिकारी, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष व्यंकटेश शिंदे, काँग्रेसचे बाबु नंबरदार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
——–
* इटके काॅर्नर येथे रस्ता रोको.
इटके काॕर्नर येथे रास्ता रोको करण्यात आला.या रस्ता रोको आंदोलनात कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सूर्यभान नाना मंडे पं स. उपसभापती पिंटू मुंडे मोहन दादा सोळंके पंस सदस्य माऊली मुंडे पस सदस्य वसंत तिडके सरपंच अमर गीते नागनाथ कराड, दत्ता कराड, अभिमान मुंडे, नवनाथ जोगदंड, महारुद्र मुंडे, देवराव मुंडे, सुग्रीव मुंडे, महादेव सांगळे, तुकाराम काळे, राजेभाऊ मुंडे, बबन काळे, विष्णू पारवे, बाबुराव गिते, अमर मुंडे, बापूराव नागरगोजे, युनुस बेग, हनुमंत कामाळे, बबन कोकाटे, भागवत मुंडे, शिवाजी सोळंके, जगन्नाथ मुंडे,अगद मुंडे, राहूल मुंडे, माणिक मुंडे,भागवत मुंडे, धोडीराम मुंडे, रामेश्वर महाराज कोकाटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
No comments:
Post a Comment