Monday, October 12, 2020

अटक बलात्कारी कोरोना पाॕझिटिव्ह. कोविड सेंटरमधून पळाला.



बीड (प्रतिनीधी )- चुलत भावाच्या मुलीवर बलात्कार करून २५ वर्षीय नराधम बाळू भिमा पवार ह्या फरार झालेल्या आरोपीच्या पोलिसांनी गेल्या आठ दिवसांपूर्वी मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर त्याची कोरोना टेस्ट केली असता तो पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्याच्यावर शिरूर येथील कोेविड सेंटरमध्ये उपचार सुरू असताना पहाटे ३ वाजता त्याने कोरोना सेंटरचे लॉक तोडून तो फरार झाला. पोलिस त्याच्या मागावर असून दुपारी दोन वाजेपर्यंत तो मिळून आला नाही. सोमवार दि. ३ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी त्याला अटक केली होती. 

No comments:

Post a Comment