Monday, October 12, 2020

परळीत 60 हजारांची अवैध दारूसह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त.

परळी वैजनाथ - शहरातील संभाजीनगर पोलिसांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूला जवळ एका ऑटो मध्ये बाराशे लिटर दारू वाहतूक करत असताना पकडली आहे. पोलिसांनी सदरील ऑटो चालकाला ताब्यात घेतले आहे. दारूसह दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ही कारवाई आज (दि.12) करण्यात आली.

याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी, की डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलाच्या जवळ मोंढा भागात एका ऑटोची तपासणी केली असता त्यामध्ये बाराशे लिटर दारू आढळून आली. सदरील दारू 60 हजारांची आहे, ऑटोसह दीड लाखांचा मुद्देमाल संभाजीनगर ठाणे पोलिसांनी जप्त केला आहे.

ही कारवाई संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल भताने, पोलिस हेड कॉन्स्टेबल मोहन दुर्गे, पोलीस नाईक दत्ता गीते, अर्जुन राठोड यांनी केली. याप्रकरणी आरोपी सह ऑटो ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास संभाजीनगर पोलिस करीत आहेत.

No comments:

Post a Comment