*आंधळं दळतंय.... आणि कुत्र पिठ खातय.....अशी अवस्था गेवराई तहसीलची झाली आहे झाली*
गेवराई (प्रतिनिधी)गेवराई तहसीलचा कारभार प्रभारी तहसीलदाराच्या भरवशावर सुरू आहे कोणाचेच नियंत्रण राहिले नाही. गेवराई तहसीलची अशी अवस्था अशी झाली आहे *"आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातय "*. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, गणेश उत्सव, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, गोरगरिबांचा लाभाच्या योजना, राशन धान्य माफिया, वाळूमाफियांनी घातलेला धुमाकूळ यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गेवराई तहसील चा प्रभारी कारभार बंद करून कायमस्वरूपी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे. गेवराई चे तहसीलदार धोडिंबा गायकवाड हे रजेवर गेले आहेत. यानंतर गेवराई तालुक्यातील सावळा गोंधळाचा विचार करून जिल्हाधिकारी रेखावार यांनी गेवराई तहसिलचा अतिरिक्त पदभार माजलगाव च्या शिस्त प्रिय तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्या कडे दिला होता. गोरे यांनी या अगोदर गेवराई चा अतिरिक्त पदभार घेतला होता. तेव्हा गेवराई तहसिला शिस्त लावली होती. वाळू माफिया, धान्य माफिया यांच्या मुसक्या आवळल्या होत्या , हप्तेखाऊना निट केले होते. मात्र गोरे यांनी यावेळी गेवराई चा अतिरिक्त पदभार घेण्यास नकार दिला. त्यामुळे नाविलाजाने जिल्हाधिकारी रेखावार यांनी कागदोपत्री तरबेज असलेले व वर्तमानपत्रातून प्रसिध्दीस आलेले नायब तहसीलदार प्रशांत जाधव यांच्याकडे पदभार दिला आहे. गेवराई तहसिल मध्ये प्रभारी राज सुरू झाले आहे. यावर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळे हैराण आहेत. आणीबाणीचा प्रसंग आहे. मात्र तरी महसूल प्रशासनाचे विशेष लक्ष नाही. प्रशांत जाधवर हे कागदोपत्री आपण कसे काम करतो हे दाखवत असले तरी अनेक समस्या कायम आहेत. कोरोना च्या प्रादुर्भाव होवू नये यासाठी शेतकऱ्यांची कामे सजावरच होणे आवश्यक होते. मात्र अनेक तलाठ्यांचे गेवराई शहरात सज्जे आहेत. यामुळे शेतकऱ्यांना गाव सोडून गेवराई शहरात शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागतात. तहसिल कार्यालयात कर्मचारी कधीही येतात. अधिकारी आपल्या मर्जी प्रमाणे कार्यालयात उपस्थित राहतात. त्यामुळे शेतकरी, लाभार्थी व सर्व सामान्य व्यक्तीला हेलपाटे मारावे लागतात. अनेक अनेक लाभार्थ्यांना त्यांना मिळणाऱ्या धान्यातील अर्धेच धान्य मिळते. गोदावरी पट्यात अनेक गावांमध्ये वाळू तस्करांनी गोदावरी नदीच्या पात्रात केन्या टाकून जोरदार वाळू तस्करी सुरू केली आहे. गेल्या दोन महिन्यात वाळू तस्करीत मोठी वाढ झाली आहे. हप्तेखाऊ पणामुळे गोदावरी पट्यात वाळू तस्कर व माफियांचा धुमाकूळ सुरू आहे. गोदावरी पट्टा दहशतीखाले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढत आहे. अशा परिस्थितीत कागदोपत्री दिखावा करण्यापेक्षा महसूल प्रशासनाने सतर्क राहून जनतेचे अरोग्य चांगले रहावे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र यावर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही. गेवराई तालुक्यातील प्रशासकीय कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी गेवराई तहसिलची प्रभारी राजवट बंद करून कायमस्वरूपी सक्षम अधिकारी देण्यात यावा अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment