राज्याचे सामाजिक न्याय मंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या राजकीय कारकीर्दिची पायाभरणी दिवंगत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब, वक्तृत्वाचे मानबिंदू दिवंगत प्रमोदजी महाराज साहेब आणि दोन लोकनेते घडवण्याची ताकद असणारे शेतकरी, कष्टकर्यांचे कैवारी कै.पंडित अण्णा मुंडे साहेब यांनी केली. आणि जाणते राजे, पद्मविभूषण देशाचे माजी कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांनी त्यावर कलश चढवून हे आमच नेतृत्व आज शुक्रतार्या सारखं राजकीय पटलावर उठून दिसत आहे.
आज यशाच्या शिखरावर दिसणार्या या नेतृत्वाची संघर्ष गाथा खूप कष्टदायी आहे. एखाद्याला सन्मानाने निमंत्रण देवून पंचंपक्वानाचे ताट समोर ठेवावे आणि अगदी पहिला घास तोंडात घेतांनाच एखाद्या शुद्र विचाराने आणि आयुष्यभर ज्या व्यक्तीला आपण देवाचे स्थान दिले त्याच व्यक्तीने आपला हात धरून त्यावरून उठवावे. तरी पण हे सर्व सहन करत त्यांचाच आदेश शिरसावंद्य मानून मिळेल त्या आदेशाचे पालन ना.धनंजयजी मुंडे साहेब यांनी केले. शेवटी सहन शक्ती चा अंत होऊन वेगळी राजकीय चुल ना.धनंजयजी मुंडे साहेब यांनी मांडली व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
या निर्णयामुळे नव्या अग्नी दिव्यांचा सामना करावा लागला. कारण पाठीत खंजीर खुपसला, घरभेदी अशा अनेक टिकेचा 'धनी ' धनंजय, मुंडे साहेब यांना व्हावे लागले. प्रत्येक ठिकाणी तिरस्काराने भरलेल्या नजरा. ज्या वंजारी समाजाच्या मनावर अधिराज्य केलं होतं तोच समाज या निर्णयामुळे गद्दार म्हणून संबोधत होता. तर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला म्हणून जिल्ह्यातील त्या पक्षाचा विशिष्ट वर्ग हा आमच्या छातीवर का बसवला म्हणून अडचणी निर्माण करत असतांना जवाहिर असलेल्या आणि राजकारणातील भीष्मपितामह असलेले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आमच्या नेतृत्वाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी देऊन ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या वर निसीम्म प्रेम करणार्या आमच्या सारख्या हजारो कार्यकर्त्यावर जो उपकार केला त्यासाठी आमच्या कातड्याचे जोडे करून जरी पवार साहेबांच्या पायात घातले तरी हे उपकार फिटणार नाहीत. कारण यामुळे च या शापित कर्णाची दानशूर कर्ण, सुतपुञ नाही. तर कुंती पुञ आणि खरा पांडवांचा जेष्ठ वारसदार महारथी कर्ण ही ओळख जगाला झाली.
खरे राजकीय कुरूक्षेञ परळी विधान सभा
नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या सभागृहातील आक्रमक शैली मुळे संबंध महाराष्ट्र डोक्यावर घेत असताना माञ परळी विधान सभा मतदार संघात संघर्ष काही साधा नव्हता. समोर लोकनेते मुंडे साहेब यांच्या वारसदार ना.पंकजाताई मुंडे ,त्यांच्या सैन्यात रथी, महारथी होते. तर नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या कडे सर्व सामान्य कार्यकर्ते. परंतु इतिहास माहीत होता. महा शक्तिशाली रावणाकडे सोन्याची लंका, महापराक्रमी सैन्य, भगवान शंकराचे वरदान, देवांना बंदिस्त करण्याची ताकद त्यांच्या कडे असताना प्रभू रामचंद्र यांनी माञ हनुमान, जांबुवंत, नळ,निळ बहुजन, आदिवासी, उपेक्षित लोकांना जवळ घेऊन हे युध्द जिंकले होते. अगदी तसेच नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांनी सर्वसामान्य कार्यकर्ते जमवले त्यांना आयुष्यात सन्मानाने उभे केले त्यांच्या कडून असामान्य कार्य घडवून आणले. विधानसभा निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने ना.धनंजयजी मुंडे साहेब विजयी झाले. त्यांचे आणि त्यांच्या वर प्रेम करणार्या लाखो कार्यकर्त्यांचे स्वप्न पूर्ण झाले.
अश्रू ची फुले झाली. तिरस्काराची जागा पुरस्काराने घेतली गेली.
हा आमचा पालक, मंञी म्हणून कोरोना सारख्या महामारीत स्वतः चा जीव धोक्यात घालून जनतेची सेवा करत आहे.
त्याच बरोबर मंञी म्हणून परळी साठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत मंजुर केली, परळी अंबाजोगाई रस्ता, परळी शहराचा बायपास, परळी धर्मापुरी रस्ता, परळी गंगाखेड रस्ता, ११०कोटी ची भुयारी गटार योजना ,शेतकरी पीक विमा कंपन्यांनी बीड जिल्हा वगळला होता. तो परत कंपन्यांनी बीड जिल्हा सहभागी करून घेतले. यासह
येणार्या काळात शाश्वत विकास कसा असतो हे नामदार धनंजयजी मुंडे साहेब बीड जिल्ह्यातील जनतेला दाखवून देतील हा आमचा आमच्या नेतृत्वावर विश्वासच नाही तर खाञी आहे.
लोकमान्य लोकश्री धनंजयजी मुंडे साहेब
आपण नेते आहात मोठ्या मनाचे आहात. आणि म्हणूनच प्रभावशाली आहात. या आमच्या विश्वासाला लोकमान्यतेची मोहर उठवली गेली. राज्यातील प्रभावशाली मंञी ठरलात.
आपली ही वाटचाल सदैव अशीच रहावी यासाठी आमचे शुभेच्छाचे बळ सदैव सोबत राहील. नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांना जन्म दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
आपला
गोपाळ आंधळे
नगरसेवक न.प.परळी वैद्यनाथ
9823335439
No comments:
Post a Comment