Tuesday, July 14, 2020

बीड जिल्हात अफवेचा मॅसेज व्हायरल अफवेवर विश्वास ठेवू नका--जिल्हधिकारी

बीड (प्रतिनीधी )- 15 ते 20 जुलैच्या दरम्यान अत्यंत कडक लॉकडाऊन व 21 ते 30 मध्ये थोडीफार शिथीलता अशा आशयाचा मॅसेज सध्या सोशल मीडियावर फिरत असून ती पूर्णत: अफवा असल्याचे सांगून जिल्ह्यातील नागरिकांनी अशा कुठल्याही निराधार मॅसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले आहे. 
पुढील पाच दिवसांसाठी बीड जिल्ह्यात कडकडीत बंद ठेवण्यात येणार असल्याबाबतचा एक मॅसेज आज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असल्याने जिल्हाधिकार्‍यांकडून अथवा जिल्हा प्रशासनाकडून असा कुठलाही लॉकडाऊन बाबतचा आदेश काढण्यात आला नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले तर जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले

No comments:

Post a Comment