Sunday, July 5, 2020

रविवारी परळी एक तर जिल्ह्यात सहा पॉझिटिव्ह !


बीड -(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातून रविवारी पाठवलेल्या 248 स्वॅब पैकी सहा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 239 इतके रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत .बीड जिल्ह्यात गेल्या आठवडा भरापासून कोरोना बाधित रुग्णसंख्या वाढीस लागली असून शनिवारी जिल्ह्यात एकूण नऊ रुग्ण आढळून आले,त्यात पाच रुग्ण हे परळी येथील एसबीआय बँकेतील होते त्यामुळे शहरात संचारबंदी लावण्यात आली आहे . बीड जिल्ह्यात बुधवारी तीन रुग्ण आढळून आल्यानंतर शहरात लॉक डाऊन करण्यात आले असून आरोग्य विभागाने सर्व्हेक्षण सुरू केले आहे,तर शनिवारी परळीत पाच रुग्ण सापडल्याने शहरासह पंधरा गावात कॅन्टोन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे .त्यामुळे दोन दिवसापासून तपासणीसाठी पाठवण्यात येणाऱ्या स्वॅब ची संख्या वाढली असून रविवारी पाठवलेल्या 248पैकी सहा एवढे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत . परळी शहरात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असल्याने लॉक डाऊन करण्यात आले आहे,या शहरातील बँकेने पंधरा गावे दत्तक घेतलेली आहेत,या गावामध्ये देखील कॅन्टोन्मेंट झोन जाहीर केला आहे,आज आलेल्या रिपोर्ट मुळे रुग्णसंख्या वाढली असून लॉक डाऊन कडक होणार हे निश्चित आहे .

कोविड-19 05/जुलै/2020
आज 06 पॉझिटिव्ह
आजचे स्वॅब – 248
निगेटिव्ह – 239
अनिर्णित – 03
02 -जुना बाजार,बीड –38वर्षीय महिला,11 वर्षीय मुलगा
01-संत कबीर नगर,अंबाजोगाई -40 वर्षीय महिला(अलिबाग हुन आलेली)
02 आष्टी-सुरडी ता आष्टी-30 वर्षीय महिला(मुंबई हुन आलेली)गंगादेवी ता आष्टी-65 वर्षीय पुरुष
01-परळी-58 वर्षीय पुरुष


No comments:

Post a Comment