Saturday, July 18, 2020

कोरोनाचा शिरकाव केजचे तहसीलदार होम क्वारंटाईन.


केज (प्रतिनीधी ):- बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जावू लागली. अंबाजोगाई येथील वरिष्ठ महिला अधिकार्‍यास कोरोनाची लागन झाल्यानंतर सदरील अधिकार्‍यांच्या संपर्कात जे काही अधिकारी आणि कर्मचारी आलेले होते त्यांना होम क्वारंटाईन होण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामध्ये केजचे तहसीलदार यांचाही सहभाग असून ते होम क्वारंटाईन झाले आहेत. 
अंबाजोगाई येथील वरिष्ठ अधिकार्‍यास कोरोनाची लागण झाली. सदरील या अधिकार्‍याने एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला तहसीलदारसह इतर अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची उपस्थिती होती. सदरील महिला अधिकारी कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर त्या बैठकीला कोण-कोण उपस्थित होते याची माहिती घेवून संबंधितांना होम क्वारंटाईन होण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या या बैठकीला केजचे तहसीलदार यांचीही उपस्थिती होती. सदरील तहसीलदार होम क्वारंटाईन झालेले आहेत.

No comments:

Post a Comment