* जि. प. लाईव्ह संवाद कार्यक्रमात आर विमला यांचे प्रतिपादन.
पालघर: - ( प्रतिनीधी ) मासिक पाळी ही स्त्रियांना लाभलेली नैसर्गिक क्रिया असून त्यासाठी स्त्रियांनी स्वतःला अपराधी मानू नये,असे आवाहन. महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला यांनी केले आहे. गुरुवारी (28 मे) जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त पालघर जिल्हा परिषदेच्यावतीने मासिक पाळी व्यवस्थापन माहिती, प्रचार-प्रसार व उपक्रमाची माहिती. देण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी फेसबुकवर लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. मासिक पाळी हा रोग अथवा आजार नसून ती एक स्त्रियांमध्ये घडणारी नैसर्गिक क्रिया असून या काळात स्त्रियांनी वैयक्तिक स्वच्छता राखणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
तर मासिक पाळीबद्दल समाजात असलेले समज-गैरसमज दूर होऊन जनजागृती होणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी यांनी यावेळी बोलताना केले. तसेच आरोग्य समिती सभापती म्हणून खेड्यापाड्यातील महिलांना या बाबतीत काही अडचणी येणार नाहीत तसेच शिक्षण समिती सभापती. म्हणून शिक्षण विभागाकडून देखील मासिक पाळीबाबत जनजागृती करण्याचे प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन यावेळी जि.प उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी संवादात सहभागी होऊन मासिक पाळी बद्दल जनजागृती. करायची असेल तर लोकशिक्षणाशिवाय पर्याय नाही असे मत व्यक्त करून जिल्हा परिषदने असा स्तुत्य उपक्रम राबविला त्याबद्दल जिल्हा परिषदेचे अभिनंदन केले. महिला व बालकल्याण विभाग या प्रश्नासाठी जिल्ह्यातील महिलांना काही अडचणी असल्यास नेहमीच प्रयत्नशील राहील अशी. ग्वाही यावेळी महिला व बालकल्याण सभापती अनुष्का ठाकरे यांनी दिली.
या लाईव्ह संवाद कार्यक्रमात जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक माणिक दिवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे, राजेंद्र पाटील, तुषार माळी, तज्ञ वक्त्या म्हणून लाभलेल्या प्रभा तिरमारे यांनी या संवादात सहभाग घेतला. तर या लाईव्ह संवाद कार्यक्रमात जिल्हाभरातील. अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा वर्कर व अन्य महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
No comments:
Post a Comment