Thursday, May 28, 2020

दुचाकी स्कुटीला अडकवलेली २० लाखाची बॅग चोरट्यांनी पळवली.


* अंबाजोगाई न्यायालयासमोर आज सकाळी घडलेली घटना.

अंबाजोगाई;- (प्रतिनीधी )  आर्थिक व्यवहारातून आलेल्या पैशाची बॅग स्कुटीला अडकून न्यायालयात स्टॅम्प तिकिट घेण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्याने सदरची बॅग पळवल्याची घटना आज सकाळी अंबाजोगाई न्यायालयासमोर घडली. सदरच्या बॅगमध्ये २० लाख रूपये असल्याचे तक्रारदाराने तक्रारीत म्हटले असून अंबाजोगाई शहर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अंबाजोगाई येथील बांधकाम व्यवसायिक बालासाहेब गोरे यांच्याकडे आज आर्थिक व्यवहारातून २० लाखाची रक्कम आली होती. त्या रक्कमेची बॅग त्यांनी आपल्या स्कुटीला अडकवली आणि बालासाहेब गोरे हे अंबाजोगाई न्यायालयासमोर आले. त्याठिकाणी गाडी उभा करून ते स्टॅम्प तिकिट घेण्यासाठी गेले असता तेवढ्या वेळात अज्ञात चोरट्याने स्कुटीला अडकवलेली २० लाखाची बॅग चोरून नेली. सदरची घटना ही सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. गोरे जेंव्हा गाडीजवळ आले तेंव्हा पैशाची बॅग चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर गोरे यांनी या घटनेची माहिती अंबाजोगाई शहर पोलीसांना दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलीस तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment