दिल्ली : पोलीस आणि पत्रकारांमध्ये करोनाचे रुग्ण आढळल्याने अगोदरच चिंता वाढलेली असताना आता एकाच न्यूज चॅनेलच्या ३६ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
नोयडा येथील सेक्टर १६ ए मधील एका इमारतीत चालू असलेल्या चॅनेलच्या ३६ कर्मचाऱ्यांना करोना झाल्याची माहिती सुनील दोहरे या अधिकाऱ्याने दिली आहे. याबाबत अधिकृत माहिती हाती आल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, त्याचवेळी या चॅनेलमध्ये एकत्रित काम करणाऱ्या सर्वांनाच कोविड १९ झालेला नाही.५१ लोकांच्या चाचण्या केल्यावर त्यापैकी २८ जणांना करोनाची लागण झालेली आढळली आहे. तत्पूर्वी याच चॅनेलच्या आठ जणांना करोनाची लागन झाल्याचे आढळले होते.
No comments:
Post a Comment