Friday, April 17, 2020

केदारनाथचे महास्वामी सोन्याच्या मुकुटासह नांदेडमध्ये अडकून.अक्षय तृतीया मंदिराचे कपाट उघडण्याचा मुहूर्त.

*  उत्तराखंडला जाण्याच्या हालचाली

 नांदेड;- (प्रतिनीधी ) लॉकडाऊनमुळे उत्तराखंडच्या केदारनाथ येथील उखी मठचे भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर केदारनाथ मंदीराचे कपाट उघडण्यात येणार आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे ते महाराष्ट्रात अडकले आहेत. महाराष्ट्र सरकारने त्यांना त्यांच्या तीन सहकाऱ्यांसह उत्तराखंडला जाण्याची परवानगी दिली आहे. पण चार राज्य ओलांडून जायचे असल्यामुळे महास्वामी केंद्र सरकारच्या परवानगीची प्रतिक्षा करत आहेत.
केदारनाथ मंदिराचे कपाट दरवर्षी दिपावलीला बंद होते. हे कपाट अक्षय तृतीयाच्या दिवशी उघडण्यात येते. यावेळी धार्मिक विधी पार पडतो. या दोन्ही दिवसांचे विधी महास्वामी यांच्याहस्तेच संपन्न होतात. दिवाळीला कपाट बंद झाल्यानंतर केदारनाथ यांच्या डोक्यावर असणारा सोन्याचा मुकूट महास्वामींकडे असतो. महास्वामींकडे हा मुकूट सहा महिने असतो. अक्षय तृतीयाला कपाट उघडल्यानंतर हा मुकूट पुन्हा एकदा केदारनाथांच्या मुर्तीवर विधीवत ठेवला जातो. यामुळे भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी यांना अनन्यसाधारण असं महत्व आहे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन त्यांना प्रवास परवाना मिळवून दिला. मात्र, महास्वामी केंद्र सरकारच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत.

No comments:

Post a Comment