* प्रसिद्ध डॉ राहुल घुले यांच्या वनरुपी क्लिनिक मुंबई" यांच्या वतीने प्रभाग 13 मधील नागरिकांची केली वैद्यकीय स्क्रिनिंग..
परळी प्रतिनिधी : संपुर्ण भारतासह महाराष्ट्रात कोरोना या भयंकर आजाराने थैमान घातलेले असतांना या पार्श्वभूमीवर मा पंकजाताई व खा प्रीतमताई मुंडे यांच्या प्रेरणेने, नगरसेवक प्रा पवन मुंडे यांच्या विनंती ला मान देत प्रसिद्ध डॉ राहुल घुले यांच्या *"वनरुपी क्लिनिक मुंबई"* यांच्या टीम च्या वतीने प्रभाग 13 मधील 3500 जास्त एवढ्या नागरिकांनी घरोघरी जाऊन वैद्यकीय स्क्रिनिंग करण्यात आली असून प्रभागातील पुर्ण नागरिकांची स्क्रिनिंग करण्याचा प्रा पवन मुंडे यांचा मानस आहे.
कोरोना या आजाराचा लोकां मध्ये संसर्ग होऊ नये म्हणून पूर्ण भारत गेल्या 25 मार्च पासून लॉकडाऊन आहे , तरी कोरोना चा दररोज चा वाढता आकडा चिंताजनक आहे सुदैवाने बीड जिल्ह्यात फक्त कोरोनाचा एक पेशंट सापडलेला आहे याच पार्श्वभूमीवर नगरसेवक प्रा पवन मुंडे यांच्या विनंती ला मान देत मुंबई येथील प्रसिद्ध डॉ राहुल घुले हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या "वणरूपी क्लिनिक मुंबई" यांच्या टीम ने प्रभाग क्र 13 मधील जवळपास संपुर्ण भागातील 3500 पेक्षा जास्त एवढ्या लोकांचे घरोघरी जाऊन वैद्यकीय तपासणी (स्क्रिनिंग) टेस्ट केली असून नागरिकांना योग्य ती काळजी घेण्या बाबत सूचना सदरील टीम करत आहे.
वणरूपी क्लिनिक हे मुंबई मध्ये जनसेवा दृष्टिकोनातून 30 ठिकाणी केवळ 1 रुपया फीस घेऊन आपले हॉस्पिटल्स चालवते या टीम ने आतापर्यंत मुंबई मध्ये वरळी 9710,लोअरपरेल 8000,कुर्ला येथे 10000 लोकांची घरोघरी जाऊन स्क्रिनिंग केलेली आहे,डॉ घुले यांच्या सामाजिक कार्याबद्दल कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वतः आपल्या ट्विटर वरुन कौतुक केलेले आहे.सदर उपक्रमात बाबत घरपोच स्क्रिनिंग टेस्ट होत असल्याने व कोरोना आजाराबाबत मनातील शंका-कुशंका चे समाधान होत असल्याने प्रभागातील नागरिकांनी नगरसेवक प्रा पवन मुंडे व "वणरूपी क्लिनिक मुंबई" यांची टीम व डॉ राहुल घुले यांचे आभार मानले आहेत, या अभिनव उपक्रमात कार्यात वणरूपी क्लिनिक चे डॉ दीपक राठोड, डॉ संजय गवळी व प्रभाग 13 मधील युवक कार्यकर्ते महेश मुंडे , संदीप दराडे व त्यांचे सर्व सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment