Tuesday, March 10, 2020

नितीन आगे खून खटल्या साठी सरकारी वकीलाची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी गेलेले राजू आगे मुंबईहून परत .

 *गृहमंत्री अनिल देशमुख सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या दालनास वृतरत्न सम्राट चिटकावून परतले.

अहमदपूर (प्रतिनीधी )दि.10  नितीन आगे खून खटल्यातील फिर्यादी राजू आगे हे त्यांचा मुलाच्या नितीन आगे खून प्रकरणी वकिलांच्या नियुक्ती साठी दिनांक 9 मार्च सोमवार या दिवशी मंत्रालयात गेले असता सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या केबिनमधील नामफलकाच्यापुढे दिनांक 6/ मार्च या तारखेल्या वृतरत्न सम्राट मधील बातमी सह सम्राट चा अंक दोघांच्याही दालनास चिटकावून शासनाचा निषेध व्यक्त केला व परत आले.शासनाने अद्याप औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठ येथे अपील चालवण्यासाठी वरिष्ठ विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती व फितूर साक्षीदारांवर कारवाई करण्याच्या खटल्यात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती झाली नसल्याने नितीन आगे यांचे वडील राजू आगे यांनी मंत्रालयात  मंत्री महोदयांना भेटण्यासाठी गेले परंतु मंत्रालयाय गृहमंत्री अनिल देशमुख व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे दोन्ही ही मंत्र्यांची भेट झाली नाही फिर्यादी राजू आगे यांनी वृत्तरत्न सम्राट मधील दिनांक 6/मार्च 2020 रोजी आलेली बातमी मंत्र्यांच्या नामफलकांच्या बाजूला चिटकावून परत निघाले त्यांच्या सोबत नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीज NDMJ चे राज्य सचिव वैभवजी गिते महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रा.रमाताई अहिरे व प्रशांत झींने इत्यादी पदधिकारी होते.

No comments:

Post a Comment