Tuesday, March 31, 2020

मुक्या प्राण्यांच्या अन्न पाण्याची नागरिक म्हणून व्यवस्था करावी-भोजराज पालीवाल.

परळी (प्रतिनिधी)कोरोना आजारामुळे सर्वत्र संचारबंदी लागू असून रस्त्यावर फिरणारे मुके प्राणी व पक्षी यांना अन्न पाणी मिळणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेेचे माजी शहरप्रमुख भोजराज पालीवाल यांनी स्वत: मुक्या जनावरांसाठी पाणवठा ठेवला असून गॅलरी व गच्चीवर पक्षांसाठी पाणी तसेच अन्न ठेवले आहे. एक नागरिक म्हणून मुक्या प्राण्याचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे, सर्वांनीच शक्य होत असेल तर अशी व्यवस्था करावी असे आवाहन भोजराज पालीवाल केले आहे.
कोरोना आजारामुळे राज्यभरात संचारबंदी लागू असून जेंव्हा व्यवहार किंवा नागरिक रस्त्यावर असतात तेंव्हा मुक्या प्राण्यांना अन्न पाणी सहज उपलब्ध होते. संचारबंदीमुळे सर्वच रस्ते निर्मुष्य असून अन्न पाण्याच्या शोधात मुके प्राणी रस्त्यावर फिरत असतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या घराबाहेर जनावरांसाठी पाणी तसेच गच्ची किंवा गॅलरी पक्षांसाठी अन्न पाणी ठेवावे असे आवाहन पालीवाल यांनी केले आहे. दरम्यान प्राण्यांच्या जवळ जातांना तोंडाला मास्क लावावा, प्राण्यांना अन्न पाणी दिल्यानंतर साबणाने हात पाय स्वच्छ धुवावेत, शक्य असेल तर गरम पाण्याने आंघोळही करावी अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment