बीड:- ( प्रतिनीधी ) बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेत सहकारी सोसायटीच्या माध्यमातून कर्जमाफीत कोट्यावधीचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे,शेतकऱ्यां शेतकऱ्याकडून सोसायटीने कर्ज वसुली केली मात्र ते पैसे बँकेकडे भरलेच नाही बँकेकडे दाखवलीच नाही, या शेतकऱ्यां हे नाव महाविकास आघाडीच्या महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजने च्य यादीत पुन्हा नाव आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे असही मेटे यांनी उदाहरण देऊन सांगितले तसेच कर्ज न उचललेल्या शेतकऱ्यांच्या नावावरती कर्ज दाखवून कर्जमाफीचा लाभ गाव पातळी वरील सहकारी सोसायटीच्या सचिव आणि बँकेचे अधिकारी यांनी हा कोट्य वधीचा अपहार केल्याचे त्यांनी सांगितले तसेच यासंदर्भात बँकेने कबुली दिली असल्याचे आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, यात सहकारी सोसायट्यांनी केलेला घोटाळा आकडा 400 ते 500 कोटीच्या घरात असल्याचे विनायक मेटे यांनी सांगितले या पित बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिले पत्र ही पत्रकार परिषद विनायक मेटे यांनी दिले यामुळे बीड जिल्ह्या तील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली तसेच शेतकऱ्याच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या सोसायट्या व बँकेतील अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी आमदार विनायक मेटे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment