Saturday, March 7, 2026

जय महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने भव्य शिवजयंती उत्साहात साजरी; राहुल गिरी यांच्या शिवव्याख्यानाने शिवप्रेमी भारावले.


*जय भवानी-जय शिवाजीच्या घोषणांनी दुमदुमली परळी नगरी. 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून स्वाभिमान, धैर्य, न्याय आणि राष्ट्रभक्तीचे जिवंत प्रतीक आहेत. स्वराज्य ही संकल्पना सामान्य माणसासाठी उभी करून शिवरायांनी प्रजेला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. स्वराज्य म्हणजे केवळ सत्ता नव्हे, तर स्वाभिमान, न्याय आणि धर्मनिरपेक्षतेचे तत्त्वज्ञान आहे. शिवरायांनी स्त्रियांचा सन्मान, प्रजेचे रक्षण आणि न्यायनिष्ठ राज्यकारभाराला सर्वोच्च प्राधान्य दिले. आजच्या तरुण पिढीने शिवरायांच्या विचारांमधून राष्ट्रभक्ती, शिस्त आणि समाजसेवेचा मार्ग स्वीकारावा, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध शिवव्याख्याते राहुल गिरी यांनी केले.
जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समिती व जय महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवार दि. ६ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढा मैदानावर भव्य शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी “हिंदवी स्वराज्याचे संस्थापक – साहसाचा सागर आणि शौर्याचे शिखर छत्रपती शिवाजी महाराज” या विषयावर राहुल गिरी यांनी जाज्वल्य आणि प्रेरणादायी शिवव्याख्यान दिले.
आपल्या प्रभावी शैलीत बोलताना त्यांनी शिवरायांच्या अद्वितीय शौर्याचे, स्वराज्य स्थापनेमागील संघर्षाचे आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे प्रभावी चित्रण केले. किल्ल्यांची मजबूत व्यवस्था, आरमार उभारणी आणि सुज्ञ प्रशासन यामुळे शिवरायांनी आदर्श राज्यकारभार उभा केला, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या ओजस्वी शब्दांनी उपस्थित शिवप्रेमी अक्षरशः भारावून गेले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, आई तुळजाभवानी, माँसाहेब जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज तसेच शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे  व भगव्या ध्वजाचे पूजन परळी नगरीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्री धर्माधिकारी, ज्येष्ठ नेते दत्ताप्पा ईटके, वैद्यनाथ देवल कमेटीचे सचिव प्रा.बाबासाहेब देशमुख, नगरसेवक, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, प्रा.पवन मुंडे, नितीन बागवाले, व्यंकटेश शिंदे, अश्विन मोगरकर, जयपाल लाहोटी, भीमराव डावरे, परळी विविध व्यापारी संघाचे माऊली फड, नंदकिशोर बियानी , महादेव आप्पा फडकरी, विलास ताटे, राधाकिशन साबळे, गोपाळ आंधळे, माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, माजी उपनगराध्यक्ष सुरेश टाक,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष ॲड.जीवन देशमुख, मनसे चे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, ज्येष्ठ नेते माधव ताटे, वंदे मातरम सेनेचे दिलीप जोशी, अमर देशमुख सर, अँड. दिलीप उजगरे, ॲड. अरुण पाठक, पत्रकार धनंजय आरबुणे, नितीन ढाकणे, बालाजी ढगे,महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक अभयकुमार ठक्कर व मार्गदर्शक प्रा.अतुल दुबे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ध्येयमंत्र व प्रेरणा मंत्र व कु. अंशिका अरुण पाठक आणि कु. श्राव्या नितीन आडेपवार त्यांचे शिवगर्जना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपस्थित शिवभक्तांनी “जय भवानी – जय शिवाजी”, “तुमचं आमचं नातं काय – जय भवानी जय शिवराय” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. भगवे झेंडे फडकवत आणि शिवरायांच्या जयघोषात संपूर्ण मोंढा  मैदान शिवमय झाले होते. मोठ्या संख्येने शिवप्रेमी युवक, महिला आणि नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अतुल दुबे यांनी केले, प्रास्ताविक व व्याख्यात्यांचा परिचय प्राचार्य अरुण पवार यांनी केले तर आभार माजी नगरसेवक रमेशआप्पा चौंडे यांनी मानले.
या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक  अभयकुमार उर्फ पप्पूअण्णा ठक्कर, मार्गदर्शक प्रा. अतुल दुबे, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मोहन परदेशी, कार्याध्यक्ष बबन ढेंबरे,  ज्येष्ठ नेते सतीश जगताप, संजय कुकडे, तळ विभाग प्रमुख श्रीनिवास सावजी, माजी नगरसेवक संजय कुकडे,किशन बुंदिले, मनिष जोशी, दिनेश लोंढे, अमित कचरे, दिपक जोशी,बजरंग औटी, बाबु शेख, तुकाराम साठे,लक्ष्मण मुंडे, योगेश घेवारे, माऊली मुंडे, योगेश जाधव, जगन्नाथ तुपसौंदर, सिद्धार्थ गायकवाड, नवनाथ वरवटकर, सोमनाथ गायकवाड, आकाश जाधव, रितेश पवार, प्रकाश देवकर, अजय पवार, रवी देवकर, कृष्णा बेदरकर, पवन रेवले, माऊली बागवाले, विजय रेवले, अविनाश वडुळकर, सचिन साठे, संदीप भिसे आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment