छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) प्रवासी तरुणाला चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील निर्मनुष्य परिसरात नेत मारहाण करुन रिक्षाचालकाने लुटले. ऑनलाईन तसेच रोख स्वरुपात त्याच्याकडील पैसे हिसकावून चालत्या रिक्षातून ढकलून देत तो पसार झाला. २८ फेब्रुवारी रोजी रात्री घडलेल्या घटनेप्रकरणी २ मार्च रोजी रात्री मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकासह त्याच्या दोन गुंड साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रवाशांची सुरक्षा व रिक्षाचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.
सर्वसामान्य व प्रामाणिक रिक्षा व्यावसायिकांमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक गुंंड प्रवृत्तीचे व्यक्ती, गुन्हेगारांनी प्रवेश केला. त्यातून अनेकदा प्रवाशांची लुटमार, प्राणघातक हल्ले, शिवीगाळ, महिला, तरुणींसोबत गैरप्रकाराच्या घटना शहरात घडल्या. अशाच गुन्हेगार रिक्षाचालकांनी थेट पोलिसांवरच प्राणघातक हल्ला केल्याच्या तीन घटना घडल्या. वाहतूक पोलिसांकडून सातत्याने त्यांच्यावर कारवाई होते. मात्र, तरीही गुन्हेगार रिक्षाचालकांमुळे नागरिक व प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
No comments:
Post a Comment