काही माणसे केवळ बातम्या लिहित नाहीत,तर ती समाजाची नाडी ओळखून शब्दांतून बोलकी करतात. अशीच एक संवेदनशील, अभ्यासू आणि लोकांशी नातं जपणारी लेखणी म्हणजे परळी वैजनाथ येथील दैनिक लोकमतचे ज्येष्ठ वार्ताहर -श्री. संजयभाऊ खाकरे.
गेल्या 31 वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले संजयभाऊ खाकरे म्हणजे परळी शहरातील विश्वासार्हतेचे प्रतीक बनले आहेत. त्यांच्या निष्ठावान आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत दैनिक लोकमतचा ‘स्टार गोल्ड पुरस्कार’ त्यांना प्राप्त झाला, ही केवळ वैयक्तिक सन्मानाची बाब नसून परळीच्या पत्रकारितेला मिळालेली मानाची पावती आहे.
पत्रकारिता ही त्यांच्यासाठी केवळ उपजीविकेचे साधन नसून समाजाशी संवाद साधण्याचे माध्यम आहे.
ते स्वतः बोलायची आवड असल्यामुळे कोणत्याही विषयाचा गाभा समजून, तो मुद्देसूद, संयत आणि सत्याधिष्ठित शब्दांत मांडणे ही त्यांची खासियत आहे. बातमी असो वा समाजातील वेदना—त्यांची लेखणी नेहमीच माणुसकीच्या बाजूने उभी राहिली आहे.
संजयभाऊ खाकरे हे परळी वैजनाथचे पंचम ज्योतिर्लिंग, प्रभू श्री वैद्यनाथ यांचे ते निस्सीम भक्त आहेत. दररोज सकाळी प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेऊनच ते आपल्या कामाची सुरुवात करतात. श्रद्धा, शिस्त आणि सातत्य या त्रिसूत्रीवर उभा असलेला त्यांचा दिवस त्यांच्या जीवनदृष्टीचे सुंदर दर्शन घडवतो. सर्वांशी अत्यंत गोड बोलणे, मान-सन्मान देणे आणि आपुलकीने संवाद साधणे हा त्यांचा स्वभाव आहे. म्हणूनच परळी शहरात त्यांच्याविषयी केवळ ओळख नाही, तर खरा आदरभाव आहे.
आज ६ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा करणाऱ्या श्री. संजय खाकरे यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि लेखणीला अधिक बळ मिळो, हीच सदिच्छा. त्यांची पत्रकारिता अशीच सत्याची मशाल घेऊन समाजाला दिशा देत राहो, आणि श्री विरभद्र देवता व प्रभू वैद्यनाथांची कृपा सदैव त्यांच्या पाठीशी राहो-हीच मनापासून प्रार्थना!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
*समाजाशी घट्ट नातं*
वीरशैव लिंगायत समाजाच्या सर्व सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांमध्ये ते आवर्जून, हिरीरीने सहभागी होत असतात. समाजाशी नातं केवळ शब्दांत नव्हे तर कृतीतून जपणारे असे हे व्यक्तिमत्त्व आहे. कुटुंबवत्सलतेची परंपरा त्यांनी जपली आहे. त्यांची दोन्ही मुले उच्च शिक्षण घेत असून, ज्ञान, संस्कार आणि कर्तृत्व यांचा वारसा पुढील पिढीकडे ते शांतपणे सोपवत आहेत.
*बालाजी ढगे*
पत्रकार , परळी वैजनाथ
9890338694
No comments:
Post a Comment