Tuesday, February 3, 2026

सौ.पार्वती महादेव हुंडेकर यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन.

परळी वैजनाथ, (प्रतिनिधी):- पार्वती महादेव हुंडेकर (वय 30) यांचे मंगळवार दि.3 फेब्रुवारी 2026 रोजी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. वैजनाथ मंदिर लिंगायत स्मशान भूमी येथे सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार.त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. अत्यंत कमी वयात त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पार्वती हुंडेकर या स्वभावाने शांत, मनमिळावू व कुटुंबवत्सल होत्या. घरातील सर्व जबाबदार्‍या त्या अत्यंत निष्ठेने पार पाडत असत. कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे त्या नातेवाईक, शेजारी व परिचितांमध्ये विशेष परिचित होत्या.
त्यांच्या पश्चात दोन लहान मुले, पती, सासरे सासू असा भरगस परिवार आहे. दोन चिमुकल्या मुलांच्या डोक्यावरून मायचे छत्र हरपल्याने हुंडेकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.कांतीकारी साथी हुंडेकर यांच्या दु:खात सहभागी. 

No comments:

Post a Comment