सकारात्मक पत्रकारीता समाजाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण-भास्करमामा चाटे.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दै.सोमेश्वर साथी हे सकारात्मक वाटचाल करणारे वर्तमानपत्र असुन त्यांनी प्रकाशित केलेली दिनदर्शिका वाचकांसाठी उपयुक्त ठरेल असे नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी सांगितले तर सकारात्मक पत्रकारीता समाजाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण असुन त्यादृष्टीने वाटचाल करणे समाजाला अपेक्षित असल्याचे जेष्ठ नेते भास्करमामा चाटे यांनी सांगितले.
दै. सोमेश्वर साथी या दैनिकाची नववर्ष दिनदर्शिका मान्यवरांच्या हस्ते नुकतीच प्रकाशित करण्यात आली. नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी व शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा विमोचन सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, भास्कर मामा चाटे, माजी उपनगराध्यक्ष तथा रा.काॅ.शहराध्यक्ष आयुब पठाण, नगरसेविका सौ.जयश्रीताई गित्ते, बाजार समिती संचालक जयपाल लाहोटी, नगरसेवक सचिन सारडा, राहूल केंद्रे, दयाधर्म सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष माधव मुंडे, दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्रीकांत पाटील, जयराज देशमुख, सुरेश टाक, विवेकानंद हॉस्पिटलचे डाॅ.भरत मुंडे,युवा नेते महेश मुंडे, वैजनाथ आबा कराड, युवा उद्योजक संतोष मुंडे, नारायण सानप साहेब शशीकांत चाटे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी दै. सोमेश्वर साथी या दैनिकाने सातत्याने सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केल्याबद्दल कौतुक व्यक्त केले. तसेच ही दिनदर्शिका वाचकांसाठी उपयुक्त ठरेल,असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत संपादक बालासाहेब फड, धनंजय आरबुने, नितीन ढाकणे, महादेव गित्ते,अमोल सुर्यवंशी आदींनी केले.सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रा.रविंद्र जोशी यांनी केले. दै. सोमेश्वर साथी दिनदर्शिकेमध्ये महत्त्वाच्या तिथी, राष्ट्रीय दिन, सामाजिक व सांस्कृतिक घडामोडींचा समावेश असून ती सर्वसामान्य वाचकांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
No comments:
Post a Comment