Friday, January 9, 2026

परळीमध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण.अजित पवार गट शिंदे सेना.एमआयएमची गटनेता निवडीत युती.

परळी वैजनाथ- बीडच्या परळीमध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरणपाहायला मिळत असून या राजकीय समीकरणांची जोरदार चर्चा आहे. एमआयएमसोबत अजित पवार गट आणि शिंदे सेनेने गटनेता निवडीत युती केली आहे. नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्र पक्षाच्या गटात मंत्री पंकजा मुंडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह आरोप करत निवडून आलेल्या एमआयएमच्या  सदस्याचा समावेश करण्यात आलाय, यामुळे या युतीची राजकीय वर्तुळात नव्यानं चर्चा होऊ लागली आहे.

प्रचारात पंकजा मुंडे धनंजय मुंडेंवर टीकेचे आसूड, आता MIM उमेदवार राष्ट्रवादी गटात सामील

परळी नगरपरिषद निवड जिल्हाधिकारी बीड यांच्या उपस्थितीत करण्यात आलीय. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्र पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांची निवड करण्यात आली. या गटात नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट -16 , शिवसेना शिंदे गट - 2, एमआय एम - 1, अपक्ष - 4 अशा 24 जणांचा समावेश आहे. या मित्र पक्षांमध्ये एमआयएमच्या नगरसेविका शेख आयशा मोहसीन यांचा समावेश असून उर्वरित सदस्यांमध्ये अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, आणि शिंदे सेना यांच्या नगरसेवकांचा समावेश आहे.

नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एमआयएमच्या उमेदवार शेख आयेशा मोसीन यांच्या प्रचारार्थ एमआयएमचे प्रदेश सरचिटणीस समीर बिल्डर यांनी घेतलेल्या सभेत मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर तीव्र भाषेत शेरेबाजी केली होती. या सभेने त्या प्रभागात काँग्रेस आणि एमआयएमचे उमेदवार विजयी झाले. आता हेच एमआयएमचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात सामील झाले आहेत. 

परळी नगर परिषदेमधील पक्षीय बलाबल -

परळीत नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. तर 35 नगरसेवकांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस - 16 ,शिवसेना शिंदे गट - 2, भाजपा - 7,

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट - 2, काँग्रेस - 1, एम आय एम -1,अपक्ष -6

No comments:

Post a Comment