Tuesday, January 13, 2026

छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदार संघाची अंतिम मतदार यादी जाहीर विभागात एकूण 2 लाख 88 हजार 783 मतदारांची नोंद.

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)  औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली अंतिम मतदार यादी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून आज प्रसिद्ध करण्यात आली आहे.

1 नोव्हेंबर 2025 हा अर्हता दिनांक निश्चित करून तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत विभागात  2 लाख 40 हजार 549  मतदारांची नोंद होती. त्यानंतर मतदार यादीत नव्याने नावे यादीत समाविष्ट करावयाच्या मुदतीत प्राप्त अर्जांच्या छाननीअंती 48 हजार 234 नावे नव्याने समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघात  छत्रपती संभाजीनगर (80886) जालना (31943), परभणी (23564), हिंगोली (9099), नांदेड (34521), लातूर (27688), धाराशिव (26876), बीड (54206) असे एकूण 2,88,783 नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली.

अंतिम मतदार यादीत विभागातील एकूण मतदारसंख्या 2,88,783 इतकी झाली असून यामध्ये 2,21,161 पुरुष, 67,609 महिला आणि 13 इतर मतदारांचा समावेश आहे. मतदार नोंदणीची प्रक्रिया यापुढेही चालू राहणार आहे.

No comments:

Post a Comment