*मराठा समाज उपवर विवाहयोग चळवळ निर्माण करण्याची गरज- अशोकराव हिंगे.
छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी)मराठा समाजात उपवर मुला- मुलींचे विवाह बाबत मोठी समस्या निर्माण झाली आहे. विभक्त कुटुंब व्यवस्था, आई वडील, मुलं मुली यांच्या वाढलेल्या अपेक्षा, करीअर व नोकरी मुळे होणारा विलंब,नोकरी,
पैसा अशा अनेक बाबी मुळं विवाह योग जुळून येत नाही, तीस चाळीसी गाठली तरी विवाह होत नसल्याने समाजात नवी चिंता निर्माण झाली. या समस्येचे निर्मूलन करण्यासाठी समाजातील समाजसेवा वृत्ती आणि अनुभव पाठीशी असलेल्या लोकांनी पुढाकार घेऊन विवाह जुळणी करता मध्यस्थीची भूमिका निभावली पाहिजे.
जास्तीत जास्त लोकांनी पुढाकार घेऊन मराठा समाज विवाह योग नव्या दमाने चळवळ करावी. हुंडामुक्त, समाजातील “स्टेटस” किंवा आर्थिक बंधने कमी कमी करून साध्या पद्धतीने विवाह झाले पाहिजेत. यासाठी समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे. “मराठा समाज उपवर परिचय मेळाव्याचे आयोजन करून मध्यस्थीची भूमिका निभावली पाहिजे.
असे आवाहन समाज हितचिंतक अशोकराव हिंगे यांनी केले आहे.
शिवाजीराव निकम, अशोक गायकवाड व त्यांचे सहकारी गेली पाच सहा वर्षापासून मराठा वधू वर सूचक ग्रुप चालवतात.
महाराष्ट्रभर मराठा समाजात बायोडाटा पोहोचले असून ग्रुपच्या माध्यमातून अनेक विवाह जुळले आहेत. विधायक कार्याची दखल घेऊन परवा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र मराठा सोयरीक ग्रुप आयोजित मराठा वधू वर परिचय मेळाव्यात मराठा सेवासेवक तथा ग्रुप एडमिन
शिवाजीराव निकम पाटील व अशोकराव गायकवाड पाटील यांना मराठा समाज भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता.
*औचित्य साधून काल मच्छिंद्र कुटे* व सेवानिवृत्त *इंजिनियर शिवाजीराव जाधव
यांच्या पुढाकारातून हॉटेल शांताई
येथे अशोकराव हिंगे व इंजिनियर जाहीर दादा पाटील यांच्या हस्ते निकम गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
मारुतीराव तिपाले, रजेश भुसारी, यांच्यासह ॲड.महादेव तुपे, प्रा.डाके सर,
ॲड विनायक जाधव, कल्याणराव करपे, गौतमराव पवार, ॲड.राजेश अडसूळ, महादेवराव पवळ प्रा.बंड मोहन, श्री. अच्युतराव विधाते, मारुतीराव माने, भास्कर भागडे, गोमा कदम रवींद्र भुसारी, लक्ष्मणराव सुसकर,प्रा. शिनगारे, आदी मान्यवरांसह बीड शहरातील सर्व ग्रुप ॲडमिन उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालक मारुती तपाले यांनी केली
---
No comments:
Post a Comment