केज (प्रतिनिधी) बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या गाडीचा शनिवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास केज येथे अपघात झाला. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. शुक्रवारी रात्री परळी येथील विद्यानगर भागात गोळीबाराची घटना घडल्यामुळे पोलिस अधीक्षक काँवत हे तातडीने परळी येथे गेले होते. परळीहून केज मार्गे बीडकडे परतत असताना केज येथील केजडी नदी ओलांडल्यानंतर हा अपघात झाला.
मी सुखरूप - एसपी.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘काळजी करण्याचे कारण नाही, मी सुखरूप आहे.’ तसेच, त्यांच्यासोबत असलेली त्यांची टीमही सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले. अपघाताची तीव्रता जास्त असूनही जीवितहानी न होण्याचे कारण सांगताना ते म्हणाले, ‘गाडीत बसलेल्या सर्वांनी सीट बेल्ट लावले होते. त्यामुळे गाडी डिव्हायडरवर आदळूनही कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.’
Web Summary : SP Navneet Kanwat's car met with an accident near Kej after visiting Parli due to a shooting incident. Fortunately, no one was injured. The accident occurred when the car hit a divider. SP Kanwat confirmed everyone was safe due to wearing seatbelts.
No comments:
Post a Comment