मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 31 जानेवारीपर्यंत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे मोठे आव्हान राज्य निवडणूक आयोगासमोर आहे.
त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून या निवडणुका कधी जाहीर करण्यात येतात, याबाबतची उत्सुकता सर्वांनाच आहे. अशातच आज मंगळवारी (ता. 4 नोव्हेंबर) राज्य निवडणूक आयोगाकडून महत्त्वाची पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. ही पत्रकार परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात असणार आहे, याबाबतचे परिपत्रक सुद्धा जारी करण्यात आले असून राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे दुपारी 4 वाजता सचिवालयात ही पत्रकार परिषद घेणार आहेत.
No comments:
Post a Comment